अनेक संकटे झेलून सामाजिक सेवेची कास धरूण इंजी. विश्वंभर पवारांची संघर्षमय राजकीय वाटचाल

भोकर येथील शेतकरी कुटुंबात 1984 मध्ये इंजि. विश्वंभर पवार यांचा जन्म झाला. सरांचे बारावीपर्यंत शिक्षण भोकर येथे झाले. त्यानंतर आयटीआय पॉलिटेक्निक आणि ग्रॅज्युएशन नांदेड येथून त्यांनी उत्तमरीत्या पूर्ण केले. विश्वंभर पवार यांच्यावर अण्णासाहेब जावळे, मामा देशमुख, प्रबोधनकार ठाकरे, आ. ह. साळुंखे, शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, शरदचंद्र पवार अशा विचारवंतांचा प्रभाव होता. विश्वंभर पवार यांना लहानपणापासूनच सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची आवड असल्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांच्या चळवळीमध्ये बारावीपासूनच छावा संघटनेमध्ये अण्णासाहेब जावळे यांच्या विचारांवर प्रेरित होऊन मराठा चळवळीमध्ये काम करण्यास सुरुवात केली, सामाजिक संघटनेमध्ये विविध सामाजिक कामे केली.वैचारिक आणि अभियांत्रिकी कार्य सुरू असतानाच समाजामध्ये होणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरा सालीरीती अंधश्रद्धा अन्याय अत्याचार विषमता याविरुद्ध महापुरुषांचे तसेच विचारवंतांचे शब्द ऐकल्यामुळे इंजिनीयर विश्वंभर यांनी नेहमीच विद्रोह केला आणि योग्य त्या मार्गाने विरोध करण्याचा प्रयत्न केला.पुढे त्यांनी शिव शाहू फुले आंबेडकर पेरियार विचारांनी प्रेरित झाल्यामुळे शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर शिवश्री प्रवीण दादा गायकवाड श्रीमंत कोकाटे यांच्या नेतृत्वामध्ये संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघामध्ये देखील कार्य केले. सोबतच त्यांनी मराठवाडा जनता विकास परिषद नाम फाउंडेशन पाणी फाउंडेशन इत्यादी सामाजिक संघटनांमध्ये विविध सामाजिक कामे केली.अर्थातच त्यांनी त्यांची जबाबदारी अतिशय सक्षम पणे पार पाडली.सामाजिक कार्य करत असताना महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी अभिवादन करत साजरा करणे त्यानिमित्त विविध स्पर्धा, उपक्रम राबवणे ज्यातून महापुरुषांचे विचार देखील घराघरात पोहोचले यामध्ये विश्वंभर पवार यांनी भोकर तालुक्यामध्ये अतिशय मोलाचा वाटा उचललेला आहे.या उपक्रमांमध्ये रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नेत्ररोग शिबिर, नेत्ररोग शस्त्रक्रिया शिबिर, निबंध स्पर्धा सामान्य ज्ञान स्पर्धा, मार्गदर्शन शिबिरे, वृक्ष लागवड, शालेय साहित्याचे वाटप, आणि राबवण्यात आलेल्या उपक्रमांमुळे सहभागी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी बक्षीस वितरणाचे देखील आयोजन मोठ्या उत्साहाने केले. सोबतच शहीद प्रफुल्ल गोवंदे यांचा शहीद दिन साजरा केला, उरी येथील शहीद सैनिकांना भोकर येथे श्रद्धांजली अर्पण, महापुरुषांचे विचारांचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त काढली येथे कीर्तनाचे आयोजन केले. अवयव दानाचा संकल्प केला.
आपल्या विचारांचा अभ्यासाचा आणि सामाजिक गुणवत्तेचा परिपूर्ण उपयोग इंजिनियर विश्वंभर पवार यांनी वेळोवेळी आपल्या समाजकार्यातून करून दाखवला.
एवढेच नव्हे तर 2019 मध्ये राजकीय क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष, 2022 मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष, आणि 2024 मध्ये नांदेडचे जिल्हा नियोजन समिती सदस्य अशा विविध पदावर विश्वंभर पवार हे कार्यरत होते.
पद मिळालं त्यानंतर काम तर करणे हे कर्तव्यच असते म्हणून तन-मन-धनाने चौफेर काम करणं गरजेचं आहे त्यासाठी विश्वंभर पवार यांनी अनेक सामाजिक कार्यामध्ये आपले योगदान दिले शिवाय
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई मिळवून देणे, पिक विमा व पिक कर्जाबाबत आणि विद्युत डीपी बाबत उद्भवणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढणे, नाफेड मार्फत खरेदीचे बिल तात्काळ देणे, शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी बँकांची होणारी टाळाटाळ, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, शेतकऱ्यांना वीज जोडणी तात्काळ द्यावी अशा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंबंधी संबंधित अधिकाऱ्यांमार्फत निवेदने दिली. कृषी विषयक कायदे जे केंद्र सरकारने आणले होते त्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे हे इंजिनिअर विश्वंभर पवार यांना शेतकरी पुत्र असल्यामुळे चांगलेच माहिती होते, त्यामुळे त्यांनी कोरोना काळामध्ये कृषी कायदा विरोधात तीव्र आंदोलने केली आणि गरज भासल्यास शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी मोर्चे यामध्ये देखील सक्रिय सहभाग नोंदवला..

इतकेच नव्हे तर भोकर येथे महाशिवरात्री यात्रेत पशुप्रदर्शन आयोजित करून बक्षीस वाटप देखील इंजिनीयर विश्वंभर पवार यांनी केले. तसेच भोकर तालुक्यातील सात लघु तलावातील गाळ काढण्याची मागणी देखील त्यांनी केली.

आणि भोकर तालुक्यातील दिवशी बुद्रुक येथील पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना तात्काळ फाशी देण्यात यावी याविषयी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आणि आंदोलने आणि मोर्चामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला, कोपर्डी बलात्कार प्रकरणी भोकरमध्ये कडकडीत बंद करत तीव्र निषेध व्यक्त केला.

सामाजिक परिस्थितीचा त्यांना लहानपणापासूनच अभ्यास आहे, आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या विचारांवर चालणारे इंजिनियर विश्वंभर पवार हे आपल्या व आपल्या कुटुंबीयांच्या वाढदिवसानिमित्त व सणानिमित्त अनाठाई व वायफळ खर्च न करता अपंगांना साहित्याचे वाटप, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत, फळे बिस्किट वाटप शालेय साहित्य वाटप वृक्ष लागवड, गरजूंना ब्लॅंकेट साडी चोळी व जमेल तेवढी आर्थिक मदत, दीपावलीनिमित्त मिठाई वाटप, विकलांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्य अन्नदान व फळे वाटप, हिवाळा जिव्हाळा या कार्यक्रमांतर्गत गरजूंना कपडे वाटप, आरोग्यविषयक साहित्य वाटप इत्यादी उपक्रमांचे अतिशय आनंदाने आयोजन करतात.

याशिवाय अपंगांचा 5% निधी त्वरित वाटप करा, नांदेड म्हैसा उमरी भोकर या चौकामध्ये गतिरोधक व साईन डिसिजन तात्काळ बसवा, रखडलेले गुरु गौरव पुरस्कार त्वरित देण्यात यावे, विभागीय कार्यालय रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण विमानसेवा सुरू करावी यासाठी राज्यपालांकडे मागणी, विद्यार्थ्यांना व नागरिकांना ये जा करण्यासाठी वाहतूक व्यवस्था अपुरी पडत असल्यामुळे बस फेऱ्या वाढवाव्या, भोकर बाजार समितीच्या यार्डातील पाच व्यापारी गाळ्यांचा लिलाव थांबवा या व अशा विविध मागण्यांसाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदने दिली व त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. कोरोना काळात फेस शील्डचे वाटप, अन्नधान्य वाटप केले.नागपूर अधिवेशनावर मराठा आरक्षण संदर्भात मोर्चामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला, मराठा समाजाला आरक्षण द्या अशा मागण्यांची पत्र लेटर टू पीएम या कार्यक्रमांतर्गत नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आले, सरसकट मराठा समाजास कुणबी म्हणून ओबीसी मध्ये समाविष्ट करावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना केली.सामाजिक बांधिलकी जपत मागील 14 वर्षांमध्ये 80% समाजकारणाने 20% राजकारण या माध्यमातून विश्वंभर पवार यांनी काम केले, सिविल इंजिनियर च्या माध्यमातून भोकर मधील अनेक घरकुलांचे प्रश्न नगर परिषदेमधील बांधकामाचे प्रश्न
काम करत असताना तेथील मंदिर मज्जित बुद्ध विहार स्मशानभूमीला आर्थिक मदत करत सहकार्य करण्याचा प्रयत्न इंजिनिअर विश्वंभर पवार यांनी केलेला आहे.याच सर्व गोष्टींमुळे इंजिनीयर विश्वंभर पवार यांना हजरत अली शहा उर्स कमिटीच्या वतीने उत्कृष्ट समाजसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला.सामाजिक भान कार्यशैली लोकांना बोलण्याची पद्धती मनमिळावू स्वभाव निष्कलंक चेहरा ज्ञानवंत विचारवंत आणि जिद्दी बाणा असणारे इंजिनियर विश्वंभर पवार यांना समाजातील परिस्थितीची आणि तेथील प्रश्नांची जाण आहे.विश्वंभर पवार बेरोजगारांना, शेतकऱ्यांना, महिलांना विद्यार्थ्यांना कष्टकऱ्यांना दिन दुबळ्यांना अनाथांना स्वतःच्या खांद्याला खांदा लावून पुढे घेऊन जातील हे मात्र निश्चित आहे.

Google Ad