चोरीस गेलेल्या मोटार सायकली भोकर पोलिसांनी आरोपी कडून केले हस्तगत..

भोकर:- (प्रतिनिधी)
भोकर तालुक्यातील काही गाड्या काही दिवसापूर्वी चोरी गेल्या होत्या त्या शोधण्यासाठी पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपी सदाशिव उर्फ सदानंद शंकर गोरे, वय 26 वर्षे, व्यवसाय: मजुरी, राहणार रेणापूर, तालुका भोकर,जिल्हा नांदेड जप्त केलेला माल 30,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल, क्रमांक MH-26-Z-0705, इंजिन क्रमांक HA10EAAHF03583 आणि चेसीस क्रमांक MBLHA 10EEAHF20804.84,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची होंडा शाईन कंपनीची मोटारसायकल, क्रमांक MH-26-CS-0867, इंजिन क्रमांक HC15EG1355981 आणि चेसीस क्रमांक ME4HC152GRG355981
35,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल, क्रमांक MH-26-S-2909, इंजिन क्रमांक 07M15E03687 आणि चेसीस क्रमांक 07M03F07084 एकूण 1,49,000 रुपये किमतीचा मुद्देमाल माल जप्त करण्यात यश आले आहे.नांदेडचे पोलीस अधीक्षक श्री. अविनाश कुमार यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. 25/02/2025 रोजी भोकर पोलीस ठाण्यात मारोती आनंदराव पुजारवाड यांनी तक्रार दाखल केली. त्यांच्या भावाच्या मालकीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल, क्रमांक MH-26-Z-0705, भोकर बसस्थानकाजवळून चोरीला गेली होती.पोलीस निरीक्षक श्री. अजित कुंभार यांच्या माहितीवरून, पोलीस कर्मचारी सोनाजी कानगुले आणि प्रमोद जोंधळे यांनी सदाशिव गोरे याला चोरीच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले.तपासादरम्यान, सदाशिव गोरे याने गुन्ह्याची कबुली दिली आणि इतर दोन मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले.त्याच्याकडून चोरीला गेलेल्या दोन मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या.भोकर पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचे एकूण तीन गुन्हे उघडकीस आणले आणि 1,49,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.गुन्हे उघडकीस आणणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी श्री.अविनाश कुमार,पोलीस अधीक्षक, नांदेड,श्री.खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक,भोकर,श्री. सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड,श्रीमती शफकत आमना, सहायक पोलीस अधीक्षक, उपविभाग भोकर,श्री. अजित कुंभार, पोलीस निरीक्षक,सोनाजी कानगुले, पोलीस हवालदार,प्रमोद जोंधळे, पोलीस कर्मचारी हे करीत आहेत सदरील ह्या कामगिरीने पोलिसांच्या बाबतीत भोकरची जनता आनंदी आहे.

Google Ad