डॉ. कैलास कानिंदे यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित मानद डि.लीट. पदवी मिळाल्याबद्दल सत्कार.

श्रीक्षेत्र माहूर :बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित श्री रेणुकादेवी महाविद्यालय, श्रीक्षेत्र माहूर येथील समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. कैलास कानिंदे यांना त्यांच्या संशोधन व समाजकार्यातील भरीव योगदानाबद्दल अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका विद्यापीठाने नुकतीच मानद डि.लीट. (Doctor of Letters) पदवी बहाल केली आहे.
या गौरवप्राप्तीच्या निमित्ताने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड यांच्या हस्ते डॉ. कानिंदे यांचा स्वागत, सत्कार व अभिनंदन करण्यात आले. या सोहळ्यात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ . तुळशीदास गुरनुले यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. कैलास कानिंदे यांनी समाजशास्त्र क्षेत्रात केलेले संशोधन, ग्रामीण भागातील सामाजिक समस्यांवर केलेले कार्य व शिक्षणाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे योगदान याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयात तसेच माहूर परिसरात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. कानिंदे यांनी संस्थेच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, भविष्यातही समाजसेवा व संशोधनाची गती कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.