पदनाम बदल आता कोतवाल नाही तर महसूल सेवक म्हणा…

उमरी ता प्रतिनिधी/ कैलास सोनकांबळे / तालुका व जिल्ह्याचे नाव महसूल विभागातील गाव पातळीवरील कोतवाल कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून चतुर्थ श्रेणी आणि इतर मागण्या मान्य करण्यासाठी आंदोलन सुरू आहे याचाच एक भाग म्हणून मुंबई येथे आझाद मैदानात आंदोलन झालेले आहेत त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र काम बंद आंदोलन सुरू आहे याची फलश्रुती म्हणून शासनाने चतुर्थ श्रेणीची मूळ मागणी सोडून इतर काही मागण्या मान्य केल्या आहेत त्यातच पदनाम बदल ही मागणी मान्य केली आहे, आता तलाठी कार्यालयात तलाठ्यांना सहकार्य करणारे कोतवाल कर्मचारी हे महसूल सेवक म्हणून ओळखले जातील तसा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केला आहे. महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने चतुर्थ श्रेणी चा दर्जा देणे, पदनाम बदलणे, विविध शासकीय भरतीमध्ये आरक्षण इत्यादी मागण्या ठेवलेल्या होत्या त्यापैकी पदनाम बदलण्याची मागणी शासनाने मंजूर केली आहे यात नवीन पदनाम सहाय्यक ग्राम महसूल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी सहाय्यक आणि महसूल सेवक असे पर्याय देण्यात आले होते त्यापैकी महसूल सेवक या पदनामा मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आणि तसा शासन निर्णय सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला, झालेल्या निर्णयाचे संघटनेने स्वागत केले असून मूळ मागणी सुद्धा याच प्रमाणे तात्काळ मान्य करावी अशी मागणी करण्यात आली आहे. ब्रिटिश कालीन आणि मुघल कालीन नावे बदलण्याचे महसूल मंत्र्यांनी धोरण जाहीर केले होते त्या अनुषंगाने महसूल विभागातील जवळपास सर्वच पदांचे पदनाम बदलण्यात आले आहे याचप्रमाणे आता कोतवाल ही पदनाम महसूल सेवक नावाने तर तलाठी हे पदनाम ग्राम महसूल अधिकारी या नावाने ओळखले जाणार आहे, याचप्रमाणे आम्हाला चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा ही सुद्धा मागणी शासन दरबारी प्रलंबित असून ती तात्काळ मंजूर करावी अशी आमची मागणी आहे. तालुकाध्यक्ष
कालानुरू पदनाम बदलणे अत्यंत आवश्यक होते आणि यासाठी कोणताही निधी शासनाला लागणार नाही असे आम्ही संघटनेच्या वतीने शासनाला निवेदन देऊन पटवून दिले होते, आता पदनामात बदल केल्याने या पदाची ओळख सुद्धा निश्चितपणे बदलेल असा विश्वास मिळाला आहे. तालुका संघटक.
गाव पातळीवर काम करत असताना जुन्या पदनामात हिनतेची व अन्यायाची भावना मनात असायची आता ती काही प्रमाणात दूर होणार आहे, कोतवाल पदनाम बदलून महसूल सेवक करण्याचा चांगला निर्णय शासनाने घेतला आहे या निर्णयाचे महसूल सेवक संघटनेचे संघटक तथा जिल्हा महसूल सेवक संघटनेचे सचिव राजेश राठोड यांनी शासनाचे निर्णयाचे स्वागत करत आभार व्यक्त केले.
तसेच उमरी महसूल सेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष दिलीप यम्मेवार, तालुका संघटक जिल्हा सचिव राजेश राठोड, कमळे मल्लू, उत्तम हनवते, माधव कदमबांडे, विपुल बारटक्के, साईनाथ तोटेवाड, मोईस शेख, सुरेश चंचलवाड, सतीश ढगे, धम्मदिना हनवते, दर्शना देवके, करुणा वडजे, आदींनीही शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत आनंद उत्सव साजरा केला.