परभणी येथील तरुणाच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करा या मागणी साठी भोकर बंद शंभर टक्के प्रतिसाद

भोकर ( प्रतिनिधी ) परभणी संविधान विटंबना प्रकरणी ॲड सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी या तरुणास पोलीसांनी बेदममारहाण केल्याने मृत्यु झाला असुन मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करा या मागणी साठी भोकर येथील सर्व संविधान लोकशाही समर्थकाच्या वतीने निवदेन देण्यात आले
सादर करतो की, परभणी येथे दि १० डिसेंबर रोजी भारतरत्न राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील संविधान प्रतिआकृतीची विटंबना सोपान पवार नावाच्या माथेफिरु समाजकंटकाने केली विटंबनेच्या निषेधार्त आंदोलनकर्ते अॅड. सोमनाथ व्यंकट सुर्यवंशी या तरुणास पोलीसांनी बेदम मारहाण केल्याने मृत्यु झाला आहे. कोबिंग ऑपरेशनच्या नावाखालील पोलीसांनी दलीत वस्तीत घुसून महिला, पुरुष, तरुणांना निर्दयीपणे लाठी हल्ला करुन जखमी केले. तसेच निष्पाप तरुणावर दंगलीचे गुन्हे दाखल करुन त्यांना तुरुंगात डांबले आहे या निषेर्धात दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी भोकर शहर शंभर टक्के बंद ठेवण्यात आले प्रमुख मागण्या अॅड. सोमनाथ सुर्यवंशी याचा पोलीस मारहाणीत मृत्यु झाल्याने मारहान करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यावर मणुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा ,मयत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या वारसांना ५० लाख रुपयाची मदत देवुन त्यांच्या कुटूंबातील व्यक्तीस शासकीय नोकरी देण्यात यावी,संविधान विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करावा,परभणी येथील अंदोलन कर्त्यावरील सर्व गुन्हे मागे घेवुन त्यांची सुटका करावी ,दलित वस्तीत घुसून पोलीसांनी महिला, पुरुष, तरुणांना मारहाण करीत व वाहानांची तोडफोड केली तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असुन विनाकारण मारहाण करणाऱ्या पोलीसांना निलंबित करण्यात यावे अशा अशयाचे मागणी निवेदन मुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्या तर्फे पाठवण्यात आले तर अनुचित प्रकार घडु नये म्हणुन पोलीस निरीक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शना खाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता भोकर बंद ला व्यापारी,शाळा, महाविद्यालय, एस टी बस सहभाग नोंदवुन शंभर टक्के प्रतिसाद मिळाला या वेळी एल ए हिरे ,गोविंद बाबा गौड पाटील,डॉ साईनाथ वाघमारे ,बि आर पांचाळ,उत्तम बाभळे,माधव अमृतवाड,जयभीम पाटील,नामदेव वाघमारे,भिमराव दुधारे,दिलीप के.राव,डॉ मनोज गिमेकर,डॉ विजयकुमार दंडे, देविदास हटकर ,डॉ कैलास कानिदें,सुलोचना ढोले, सुरेखा गजभारे,सुलोचना गायकवाड ,सुरेखा माळे, शमीम बेगम ,विक्रम क्षिरसागर,कपील कांबळे, सुनील कांबळे, जुनेद पटेल,सिद्धार्थ जाधव, उत्तम कसबे ,प्रतिक कदम,संदीप गायकवाड,मिलींद गायकवाड,शंकर कदम,मनोज शिंदे,संतोष डोंगरे,आनंद ढोले,निळकंट वर्षेवार ,तौसीफ इनामदार,संतोष आलेवाड,बाबाखान पठाण ,माणिक जाधव,रमेश गंगासागरे ,दयानंद गुंडेराव,दलित डोंगरे, राहुल सोनकांबळे,अविनाश गायकवाड, पांडुरंग वर्षवार ,सतिश जाधव,भिमराव हनवते,साहेबराव वाहुळकर,गोविंद थोरात,साहेबराव हनमंते,गणेश वाघमारे,मिलिंद दुधारे,आशिष वाघमारे,आदित्य वाघमारे,तथागत गाडेकर,सतिश गुंडेराव, सुमित खंडेलोटे,मनोज मोरे,भागवान जाधव,अभिनंदन दांडगे,अशित सोनुले,निखील हंकारे ,वंसंत जाधव,बिंबीसार पाटील, अतुल महाबळे ,नरेंद्र मोरे,बंटी वाघमारे,दिगांबर कांबळे,विश्वजीत जळपतराव,प्रसेनजीत पाटील,प्रकाश वाघमारे,उमाकांत एडके,किरण डगारे,शुभम गोदाम छोटू हनवते आदि राष्ट्रप्रेमी नागरीकासह उपस्थित होत