भोकरच्या विकासाला डबल इंजिनच्या सरकारची साथ भक्कमपणे मिळेल -खा.अशोकराव चव्हाण..

आमदार एड.श्रीजया चव्हाणांच्या विजयाचा भोकरमध्ये जल्लोष
भोकर (तालुका प्रतिनिधी)भोकरच्या जनतेने दिलेला शब्द पाळला असून आमदार श्रीजया चव्हाण यांच्या विजया साठी सर्व घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, खंबीरपणे पाठीमागे उभा राहिलात,आज सर्वांचे आभार मानण्यासाठी मी येथे आलो असून भोकरच्या विकासाला आता केंद्रातील सरकार आणि राज्यातील महायुती डबल इंजिन सरकारची साथ मिळणार असल्याने भोकरचा भक्कमपणे विकास होईल असा विश्वास माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी भोकर येथील आभार सभेत बोलताना व्यक्त केला.
भोकर विधानसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित आमदार ऍड.श्री जयाताई चव्हाण ह्या,1 लाख 33 हजार 187 मते घेऊन 50 हजार 551 मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्याने भोकर येथे दि.24 नोव्हेंबर रोजी गणराज मंगल कार्यालयात आभार सभा आयोजित करण्यात आली होती. प्रारंभी नवनिर्वाचित आमदार श्रीजयाताई चव्हाण यांचा भाजपा युवा मोर्चा,रिपाई गट,राष्ट्रवादी काँग्रेस, महिला मोर्चा ,पत्रकार संघ,ओम शांती केंद्र यांच्या वतीने व प्रत्येक गावाच्या ग्रामस्थांच्या वतीने पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले या आभारासभेत पुढे बोलताना माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण म्हणाले तेलंगानातील काँग्रेस नेत्यांनी भोकर मध्ये येऊन लुडबुड केली मात्र या भागातील मतदारांनी काही ऐकले नाही जबरदस्त साथ दिली लाडक्या बहिणींची साथ मोठ्या प्रमाणावर मिळाली लोकशाही मजबूत करायची आहे नव्याने विकासाच्या कामाला लागायचं आहे काँग्रेस पक्षाकडे विरोधी पक्ष होण्याएवढे सुद्धा पाठबळ राहिले नाही नांदेड जिल्ह्यामध्ये यापूर्वीसुद्धा नऊ जागा निवडून आणल्या होत्या त्यानंतर आता सुद्धा जिल्ह्यात नऊ जागा महायुतीच्या आल्या आहेत पुढील पाच वर्षात गतिमान विकास होईल यापुढे पाच वर्ष विकास होतच राहील तुमच्या सर्वांची साथ अशीच असू द्या सर्वांनी श्रीजयाला सांभाळून घ्या असे खा.चव्हाण म्हणाले. देशाच्या नकाशावर भोकरचे नाव तुम्ही सर्वांनी कोरल-आमदार एड.श्रीजया चव्हाण.सर्व मतदारांच्या आशीर्वादाने मला भोकरचा आमदार होता आले हा खूप मोठा आनंद असून माझ मन भरून गेलं आहे तुम्ही सर्वांनी मला आपली मुलगी म्हणून जपले प्रचाराच्या काळामध्ये कुठे धक्का लागू दिला नाही माझे आजोबा वडील आई यांनी या भागाचे नेतृत्व केलं आता मला सुद्धा या भागाचा विकास करण्याची संधी मिळाली तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने भोकरचं नाव देशाच्या नकाशावर कोरलं गेलं आहे लाडक्या बहिणींनी आपलं कुटुंब म्हणून माझ्यावर प्रेम केलं भोकरच्या विकासाला कधीच कमी पडू देणार नाही अशी ग्वाही नवनिर्वाचित आमदार श्री जया ताई चव्हाण यांनी यावेळी बोलताना दिली. बोलण्यापूर्वी त्या व्यासपीठावरून सर्वांना नतमस्तक झाल्या.या कार्यक्रमास माजी आमदार अमर राजूरकर,नरेंद्र चव्हाण,मंगाराणी आंबुलगेकर,सभापती जगदीश पा. भोशीकर,भाजपा जि .उपाध्यक्ष किशोर पाटील,तालुका अध्यक्ष गणेश पा.कापसे, समन्वयक भगवान दंडवे, राजेश अंगरवार, विनोद पा.चिंचाळकर , राष्ट्रवादी तालुका अ.राजेश देशमुख ,विशाल माने, वेणू कोंडलवार,बाबुराव अंदबोरीकर,दिलीप सोनवडे,डॉ.राम नाईक, डॉ. बालाजी बिलरवार, अत्रीक पाटील मुंगल,माधवराव अमृतवाड,सरपंच संघटना अध्यक्ष मारुती भोंबे,उपसरपंच कैलास पाटील बालाजी पा .शानमवाड,केशव पा.सोळंके, संजय बरकमकर कल्पनाताई भोसले, मिर्झा ताहेर बेग,डॉ.फिरोज इनामदार
भोकर मध्ये फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
नवनिर्वाचित आमदार ऍड.श्रीजयाताई चव्हाण यांच्या विजयाच्या जल्लोष भोकर मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण करून, ढोल ताशांच्या गजरात सर्व कार्यकर्ते युवा कार्यकर्ते महिला यांच्या वतीने जल्लोष करण्यात आला उघड्या जि प वर माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण ,आमदार श्री जयाताई चव्हाण यांनी सर्वांना अभिवादन केले कार्यकर्त्यांनी यावेळी जय घोष करून विजयाचा आनंद उत्सव साजरा केला