भोकर मध्ये किराणा दुकान वर होत आहे तारीख संपलेल्या” रामबंधु” लिंबाच्या लोणच्याची विक्र..

अन्न व भेसळ निरीक्षक झोपेत..दुकानाला भेट देऊन करतात वसुली
भोकर (तालुका प्रतिनिधी)नागरिकांना चांगल्या प्रतीचा माल मिळावा त्यामध्ये भेसळ असू नये,अन्नपदार्थ चांगल्या दर्जाचे मिळावे त्यामध्ये शुद्धता असावी यासाठी नागरी संरक्षण कायदा शासनाने केला आहे,त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व भेसळ विभागाचे निरीक्षक देखील नेमले आहेत मात्र सदर अन्न व भेसळ निरीक्षक केवळ नावालाच असून भोकर शहरातील किराणा दुकानदाराकडून वसुली करण्यासाठी येतात नियम मात्र बघत नाहीत चक्क तारीख संपलेल्या पदार्थांची विक्री केली जाते,राम बंधु लिंबाच्या लोणच्याची बॉटल 4 महिन्यापूर्वी बाद झालेली तारीख असताना सुद्धा विक्री करण्यात आल्याने नागरिकांच्या आरोग्याची जीवघेणा खेळ व्यापारी खेळत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.नागरिकांच्या आरोग्याची कुठलाही धोका निर्माण होऊ नये स्वच्छ आणि चांगल्या दर्जाचा किराणामाल,विविध खाद्यपदार्थ,छापील किंमती प्रमाणे व तयार झालेली तारीख व बाद झालेली तारीख हे पाहूनच मालाची विक्री करावी असा शासनाचा नियम आहे मात्र अनेक किराणा दुकानांमधून हलक्या दर्जाचे धान्य विक्री केल्या जाते त्यामध्ये काही प्रमाणात भेसळ देखील असते,खुल्या गोड तेलाची सुद्धा विक्री केली जाते,शेंगदाणा,गहू,ज्वारी,दाळी व इतर पदार्थांमध्ये देखील भेसळ करतात,ग्रामीण भागातील लोक घाई गर्दीमध्ये काहीच पाहत नाहीत अशिक्षितपणामुळे अनेक वेळा या बाबीकडे दुर्लक्ष केले जाते, बाजारात वजन मापामध्ये सुद्धा घोळ केल्या जातो यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच मात्र आरोग्याचे सुद्धा नुकसान होऊ शकते
बाजारात विविध मोठ्या कंपनीचे उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत अनेक पदार्थ पॅकिंग करून विकले जातात राम बंधु कंपनीच्या गोड लिंबाच्या लोणच्याची बॉटल 24 मे 2024 रोजी किनी येथील रहिवासी उद्योजक रवी पत्की यांनी भोकर येथील मोंढा बाजारा मधील किराणा दुकानातून घाई गर्दीमध्ये इतर सामानासह विकत घेतली,घरी गेल्यानंतर सदर बाटली वरील तयार झालेली पॅकिंगची तारीख 30 एप्रिल 2023 आहे तर बाद झालेली तारीख 29 जानेवारी 2024 अशी आहे बाद झालेली तारीख संपून 4 महिने झाले हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर बॉटल तशीच ठेवली,अन्न भेसळ विभागाच्या बेजबाबदार दुर्लक्षित कारभारामुळे हा प्रकार शहरात होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले,किती लोकांना असे पदार्थ विक्री केले असतील,किती दुकानांमधून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ विक्री होत असतील याबाबत मात्र धक्काच बसला आहे
- अन्न व भेसळ निरीक्षकांचे अ
भोकर मध्ये अन्न व भेसळ निरीक्षक किराणा दुकानातील सामानाची खाद्य पदार्थांची कधी तपासणी करताना दिसत नाहीत,वर्षातून एखादी चक्कर मारून निघून जातात मात्र किराणा दुकानात होणारी भेसळ,बाद झालेले पदार्थ हलक्या दर्जाचा माल हे तपासणी करीत नसल्यामुळे काही दुकानदार भेसळयुक्त पदार्थ विक्री करीत आहेत,बाद झालेले पदार्थ किराणा दुकानातून विक्री केल्या गेल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे मात्र संबंधित अधिकारी याकडे का दुर्लक्ष करतात हे मात्र एक कोडेच आहे वजन मापे निरीक्षक सुद्धा कधी चक्कर मारत नाहीत त्यामुळे वजनामध्ये सुद्धा काही ठिकाणी घोळ होऊ शकतो नागरिकांचे आरोग्य व भेसळयुक्त मालाची विक्री या सर्व गंभीर प्रकाराकडे अन्न व भेसळ निरीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे