भोकर येथे महायुती विजय संकल्प रॅलीत सर्वांनी सहभागी व्हावे :ॲड .श्रीजया चव्हाण

विधानसभा मतदार संघात भाजपाचे अधिकृत उमेदवार ॲड . श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारार्थ महायुती विजय संकल्प रॅलीचे दि २७ रोज रविवारी १२ वाजता आयोजन करण्यात आले आहे .रॅलीनंतर लगेचच जाहीर सभा होणार आहे . महायुती विजय संकल्प.कार्यक्रमाचे अध्यक्ष खा . अशोकराव चव्हाण प्रमुख मार्गदर्शक मा आ . चंद्रशेखर बावनकुळे मा .आ . गिरीशजी महाजन माआ बाबुसिंगजी महाराज राठोड मा . सचिन साठे उपस्थिती राहणार आहेत.

भोकर तालुक्यांतील सर्वांनी महायुती विजय संकल्प रॅलीमध्ये सहभाग नोंदवावा . मान्यवरांच्या मार्गदर्शन लाभणार आहे .जास्तीच्या संख्येने मला हिंमत आर्शीवाद देण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहान भोकर मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार ॲड श्रीजया चव्हाण यांनी केले आहे .

Google Ad