भोकर विधानसभा मतदारसंघात 2 लाख 99 हजार 268 मतदार बजावणार मतदानाचा हक्कलोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ही होणार मतदान.

आदर्श आचारसंहितेचे पालन करून निर्भयपणे मतदान करावे -निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी

भोकर( बी. आर. पांचाळ) 15 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणार असल्याचे घोषित केले असून भोकर विधानसभा मतदारसंघात 2लाख 99 हजार 228 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील,आदर्श आचारसंहितेचे पालन करून निर्भय वातावरणामध्ये मतदान करावे मतदानाची टक्केवारी वाढावी अशी माहिती 85 भोकर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भोकर तहसील कार्यालयामध्ये 15 ऑक्टोबर रोजी सायंकाळी5 वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेत निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी भोकर विधानसभा मतदार संघात 2लाख 99 हजार 228 मतदार असून पुरुष मतदार 1 लाख 52 हजार 840 तर स्त्री मतदार 1 लाख 46 हजार 379 आहेत इतर मतदार ,9आहेत 85 वर्षांवरील मतदार 4427 असून दिव्यांग मतदार 2861,सैनिक मतदार 249 असल्याची माहिती दिली. भोकर विधानसभा मतदारसंघात 344 मतदान केंद्र असून 36 क्षेत्रीय अधिकारी नेमण्यात आले आहेत तर 2500 अधिकारी व कर्मचारी काम पाहणार आहेत 22 ऑक्टोबर पासून नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार 29 ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर रोजी छाननी 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येईल 20 नोव्हेंबर रोजी मतदान 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल अशी माहिती दिली या पत्रकार परिषदेस सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विनोद गुंडमवार,मुदखेडचे तहसीलदार आनंद देऊळगावकर,अर्धापूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर,हे उपस्थित होते विधानसभा निवड नुकीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करून निर्भयपणे मतदान करावे लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढवावी असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी केले

  • लोकसभेसाठी ही होणार पोटनिवडणूक*
    “”””***”””””””””””
    नांदेड लोकसभेचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर त्या जागेसाठी सुद्धा लोकसभेची पोट निवडणूक 20 नोव्हेंबर रोजीच होणार आहे त्या पोटनिवडणुकीची सुद्धा घोषणा निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आली असून भोकर विधानसभेसह6 विधानसभा मतदार संघात विधानसभा व लोकसभा निवडणूक एकाच वेळी मतदान करता येणार आहे
Google Ad