महाराष्ट्राला विकासाकडे नेण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या- प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

महायुतीकडून भोकर विधानसभा मतदार संघात मला उमेदवारी दिली याबद्दल मी आभार मानते असे सांगून भाजपा महायुतीच्या उमेदवार एड. श्री जयाताई चव्हाण म्हणाल्या या भागातील जनतेने चव्हाण कुटुंबीयांवर मोठे प्रेम केलेले आहे कै.शंकररावजी चव्हाण यांनी या भागाचा मोठा विकास केला त्यानंतर खा.अशोकराव चव्हाण अमिता चव्हाण,यांनी देखील विकासाची कामे केली हे पाहून मला फार मोठा स्वाभिमान वाटतो आणखी खूप विकास या भागाचा करायचा आहे शिक्षण,युवकांना रोजगार,महिलांना मदत अशी सकारात्मक भावना ठेवून बदल करायचा आहे महायुती सरकारच्या अनेक योजना सर्वसामान्य लोकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेल्या आहेत मी तुमची सर्वांची लेक नात बहीण असून मला तुमच्या सर्वांसाठीच विकासाचे काम करायचे आहे असे भावनिक गौरवोद्गार श्रीजया चव्हाण यांनी काढले
या सभेत सचिन साठे,माजी आ.भीमराव केराम,विक्रम काळे,जिल्हाध्यक्ष एड.किशोर देशमुख, बापूराव गजभारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या सभेस मा.आमदार राजेश पवार, अमरनाथ राजूरकर,राम पाटील रातोळीकर ,मारुती कवळे गुरुजी,गोविंदराव नागेलीकर, प्रवीण साले,चैतन्य बापू देशमुख,आनंद बोंढारकर,दिलीपराव धर्माधिकारी जगदीश पाटील भोसीकर भगवानराव दंडवे आदींची उपस्थिती
होती सूत्रसंचालन रामचंद्र मुसळे यांनी केले तर आभार गणेश पाटील कापसे यांनी मानले

Google Ad