महाविकास आघाडीचे उमेदवार कोंढेकर आज फॉर्म भरणार…

भोकर-(प्रतिनीधी )महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तिरुपती (पप्पु) बाबुराव कदम कोंढेकर हे आज (दि.29ऑक्टो) नामांकन अर्ज दाखल करणार असून भोकर तालुक्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे अवाहन भोकर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे… ८५- भोकर विधानसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून तिरुपती (पप्पु ) कोंढेकर यांचे नाव जाहीर झाले असून आज (दि .२९) भव्य रॅली काढून भोकर येथील उपविभागीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भोकर,अर्धापुर,मुदखेड तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्ष, राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार गट) ,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)आदी पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच उपसरपंच,चेअरमन बुथप्रमुख या सर्वांनी मोठ्यप्रमाणावर उपस्थित राहावे असे आवाहान भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे भोकर तालुकाध्यक्ष गोंविद बाबागौड,रा. काँ .तालुकाध्यक्ष ॲड शिवाजी कदम, शिवसेना तालुका प्रमुख संतोष आलेवाड काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तौसिफ इनामदार आदिंकडून करण्यात आले आहे…