मौजे पिंपळकौठा येथे रामायण रचनाकार महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी

मुदखेड तालुक्यातील मौजे पिंपळकोठा येथे रामायण रचनाकार अध्यकवी महर्षि वाल्मिकी ऋषीं यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यंकट दादा मुदिराज होते. प्रमुख पाहुणे म्हणून आझाद आदिवासी कोळी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य चे मराठवाडा कार्याध्यक्ष पत्रकार पवनकुमार पुठ्ठेवाड कुंटूरकर,
,प्रभाकर केंगाल नांदेड, प्रल्हाद हनमंते, सेवावृत्त शिक्षक संभाजी पाटील कर्हाळे,संरपंच प्रतिनिधी माधव वाघमारे, उपसरपंच प्रतिनिधी गुलापपाटील.सुर्यवंशी,कृ.उ.बा.मुदखेड, संचालक विजय पाटील सुर्यवंशी ॲड.प्रविण पाटील मोरे, बालाजी गुजरवाड, साईनाथ गुजरवाड, नामदेव भिमलवाड, गोविंद दिवटेवाड, रामचंद्र दिवटेवाड,आदि मान्यवर उपस्थित होते.मान्यवर उपस्थित व्यक्तीनेआपले विचार मांडले.जयंती चे अध्यक्ष बालाजी दिवटेवाड, उपाध्यक्ष नितीन बिचेवाड यांनी सर्व उपस्थित मान्यवर यांचे आभार मानले.मिरणुक गावातील प्रमुख
रस्त्याने का आली.महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने गावातील महिला, पुरुष गावातील समाज बांधव उपस्थित होते.