राज्यातील ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाचे प्रलंबित प्रश्न शासन स्तरावर पाठपुरावा करून सोडवू — –आमदार प्रा. रमेश बोरणारे

मुंबई (ता.४) : आज मुंबई येथे विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना शिष्टमंडळाने विधिमंडळ तालिका अध्यक्ष तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे सदस्य आमदार प्रा. रमेश बोरणारे यांची भेट घेऊन ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या महत्त्वाच्या प्रलंबित व जिव्हाळ्याच्या प्रश्नावर चर्चा केली यावेळी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेतील अत्यंत महत्त्वाचा व शेवटचा घटक व ग्रामीण विकासातला केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाचे मी पालकत्व स्वीकारले असून यापुढील काळात संवर्गाचे रास्त व योग्य प्रलंबित प्रश्न शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून महायुती सरकारच्या वतीने निश्चितपणे सोडविले जातील असे प्रतिपादन आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना शिष्टमंडळासमवेत चर्चा करताना त्यांनी आश्वासित केले
यावेळी स्वतः आमदार प्रा. रमेश बोरणारे यांनी आज काही काळासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित झाल्यामुळे संघटनेच्या शिष्टमंडळासमवेत ग्रामविकास विभागातील ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या प्रश्नाशी संबंधित विविध कक्षामध्ये समक्ष भेट देऊन संवर्गाचे प्रश्न संबंधित मंत्रालयीन अवर सचिव, उपसचिव, कार्यासन अधिकारी यांची भेट घेऊन संवर्गाच्या वतीने प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा घडवून ग्रामपंचायत अधिकारी संवर्ग व शासकीय विभाग यामधील अडीअडचणी समजून घेऊन मार्ग काढण्याबाबत चर्चा केली
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या राज्य वेतन त्रुटी निवारण समिती न्यायालयीन निकालावर (मुकेश खुल्लर समिती) अहवाल लागू करणे , दिनांक २४सप्टेंबर २०२४ च्या शासन निर्णयामुळे वेतन निश्चिती करताना कनिष्ठ व वरिष्ठ पदोन्नती वेतन संरचना साखळीमध्ये निर्माण झालेली असमानता दूर करण्याकरिता वित्त विभागाच्या परवानगीने शुद्धिपत्रक निर्गमित करणे, सन २०२५पासून ग्रामपंचायत अधिकारी संवर्गास स्वतंत्र ऑनलाइन बदली धोरण लागू करणे, विस्तार अधिकारी (पंचायत) गणनिहाय पदनिर्मिती करून पदोन्नतीतील कुंठीतता घालविणे , ग्रामपंचायत अधिकारी संवर्ग हा कामगार कक्षेत येत नसल्यामुळे संघटनांची अकाल्पनिक औद्योगिक मान्यता बाबत दिनांक १०ऑक्टोबर २०१८ परिपत्रकाचे पुनर्विलोकन करून रद्द करणे, शैक्षणिक अहर्ता पदवी करून सेवा प्रवेश नियमात बदल करणे, कायम प्रवास भत्ता रुपये १५०० वरून रुपये ५००० करणे, आदर्श ग्रामपंचायत अधिकारी निकष व गुणदान तक्ता अद्ययावत करणे,आदर्श ग्रामपंचायत अधिकारी संवर्गास आगाऊ वेतन वाढ कायमस्वरूपी मंजूर करणे, इत्यादी प्रश्नावर माननीय आमदार महोदय व संघटना शिष्ट मंडळ यांनी ग्रामविकास विभागातील माननीय अवर सचिव प्रशांत डोके आस्था-१२, उपसचिव सिमा जाधव आस्था-७, उपसचिव सुभाष इंगळे आस्था – ४ कार्यासन अधिकारी दिपाली पवार , कार्यासन अधिकारी नितीन पवार समक्ष भेट घेऊन निवेदन सादर करून चर्चा केली. यावेळी माननीय अपर मुख्य सचिव एकनाथ डवले दिल्ली दौऱ्यावर असल्यामुळे भेट होऊ शकली नाही लवकरच माननीय जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री व माननीय योगेश कदम ग्रामविकास राज्यमंत्री तसेच माननीय एकनाथ डवले अपर मुख्य सचिव ग्राम विकास यांच्याकडे संघटनेला बैठकीसाठी व चर्चेसाठी वेळ देणेबाबत निवेदन सादर करण्यात आले
राज्यातील ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व राज्याध्यक्ष नितीन धामणे, हरिश्चंद्र काळे (राज्यसचिव) ,मधुकर मुंगल (कार्याध्यक्ष), महेंद्र निकम (कोषाध्यक्ष), सुरेश चौधरी (जिल्हाध्यक्ष छ. संभाजीनगर) गुलाब वडजे (जिल्हाध्यक्ष नांदेड) स्नेहल नरळे पाटील (महिला उपाध्यक्ष ) ,शोभा पारसेवार (विभागीय महिला उपाध्यक्ष), शशिकांत नरोडे (जिल्हासचिव अहिल्यानगर), सुवर्णमाला जेठेवाड(नांदेड), शरद गायकवाड (अहिल्यानगर) यावेळी उपस्थित होते…..
अशी माहिती नांदेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री गुलाब वडजे
यांनी दिले..