समाजाशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार __ खाजू इनामदार

भोकर (प्रतिनिधी)महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी आपल्या आमदारकीच्या राजीनाम्यांसह काँग्रेस पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा देऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला परंतु मी काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेल्या नाही भोकर शहरातील सर्व मुस्लिम समाजाच्या मतदारांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया खाजू इनामदार यांनी दिली
अशोकराव चव्हाण हे काँग्रेस पार्टी सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील वर्षभरापासून चांगलीच रंगली होती परंतु प्रसार माध्यमांसमोर व बैठकीत अशोकराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा खोडून काढली होती.दि 12फेब्रूरावी रोजी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा (विधानसभा सदस्यत्व) राजीनामा दिला व दिनांक 13 फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आशिष शेलार खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व आदींच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी जाहीर प्रवेश केलेला हिंदुत्ववादी पक्ष म्हणून उपस्थित असलेल्या भारतीय जनता पार्टीत अशोकराव चव्हाण यांनी जाहीर प्रवेश घेतल्याने अशोकराव चव्हाण यांचे आंबेडकरवादी विचारसरणीचे कार्यकर्ते व मुस्लिम कार्यकर्ते संभ्रमात आहेत अनेक जण वेट अँड वॉच ची भूमिका बजावत आहेत तर काँग्रेस कमिटीचे भोकर शहर अध्यक्ष खाजू इनामदार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत भोकर शहरातील समाज बांधवांशी चर्चा करूनच पुढील निर्णय जाहीर करू असे स्पष्टरित्या आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे