भोकर मधील शाहू विद्यालयामध्ये सांस्कृतिक उद्घाटन समारंभ सोहळा
भोकर विधानसभेचे माजी आमदार स्व. बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांच्या स्मृती प्रित्यार्थ शाहु विद्यालयाच्या वतीने ९ ते २५ ऑगस्ट या कालावधीत भोकर येथील श्री शाहू विद्यालयात सांस्कृतिक पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन नांदेड जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांच्या हस्ते ९ ऑगस्ट रोजी होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्य स्थानी संस्थेचे सचिव गिरीश देशमुख गोरठेकर हे राहणार आहेत. शाहू सांस्कृतिक पंधरवाड्याच्या उद्घाटन सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिर्गे, तहसीलदार सुरेश घोळवे, नूतन सेवाभावी शिक्षण संस्थेचे सचिव कैलास देशमुख गोरठेकर, शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे, शिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे, गटविकास अधिकारी माधव केंद्रे, पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड, गटशिक्षणाधिकारी माधव वाघमारे, शिक्षण विस्तार अधिकारी सुमन गोणारकर, केंद्रप्रमुख अनिल शिरसाट, केंद्रप्रमुख शिवाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार अआहे.तर दुसऱ्या सत्रात प्रा. विठ्ठलराव कांगणे यांचे “वाटा शिक्षणाच्या” या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि.१० ऑगस्ट रोजी प्रा. भगवान सर्जे यांच्या सेवापुर्तीच्या निमित्ताने सत्कार होणार. या कार्यक्रमास डॉ. शंकरा चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, कैलास देशमुख गोरठेकर यांची उपस्थिती राहणार आहे. दुसऱ्या सत्रात सन्मान भूमिपुत्राचा या कार्यक्रमात डॉ. सुधीर देशमुख यांचे “वैद्यकीय शिक्षण समस्या व उपाय” या विषयावर व्याख्यान होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कैलास देशमुख गोरठेकर हे राहणार आहेत. तिसऱ्या सत्रात सेवा समर्पण परिवाराचा सत्कार व विठ्ठल फुलारी यांची प्रकट मुलाखत होणार आहे. संस्थेचे प्राचार्य संजय देशमुख हे ही मुलाखत घेणार आहेत.या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.