गुणवंत मिसलवाड यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान
नांदेड- मायडी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था, दैनिक वीरशिरोमणी, साप्ताहिक नंदगिरीचा कानोसा यांच्या संयुक्त विद्यमाने उल्लेखनीय कार्याबद्दल नुकतेच जाहीर झालेले एकुण २४ पुरस्कार विविध क्षेत्रातील विविध व्यक्तींना दि.२९ सप्टेंबर २०२४ रविवार रोजी हॉटेल गणराज पॅलेस, नमस्कार चौक नांदेड येथे भव्य अशा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय ‘मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा’ हा पुरस्कार गुणवंत एच.मिसलवाड यांना स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल, पुष्पहार देऊन प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर हे होते तर उद्घाटक म्हणून राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, विचारमंचावर प्रमुख अतिथी म्हणून किसान जनआंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष सचिन कासलीवाल, मनपाचे माजी बाल कल्याण सभापती सौ. संगीताताई डक, रिपाइंचे महिला आघाडी.राज्य सचिव सौ. वैशालीताई हिंगोले, गुरुवर्य एकनाथ महाराज कंधारकर, दत्त संस्थान विष्णुपूरीचे भारती महाराज,नामदेव महाराज बारुळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश तादलापूरकर, संयोजक तथा संपादक शंकरसिंह ठाकूर, मारोती शिकारे,त्रिरत्नकुमार भवरे, रमेशसिंह ठाकूर, शाहीर गौतम पवार, सोपान व्ही.जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वरील सर्व मान्यवरांचा संयोजन समितीच्यावतीने मारोती शिकारे,शंकरसिंह ठाकूर, लक्ष्मण भवरे यांच्या हस्ते शाल,पुष्पहार देऊन हृदय सत्कार करण्यात आला.याप्रसंगी वरील सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.सत्काराला उत्तर देताना गुणवंत एच. मिसलवाड यांनी आपले विचार मांडले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, संपादक शंकरसिंह ठाकूर व मारोती शिकारे यांनी भूतकाळात न थांबता भविष्याचा वेध घेऊन या सेवाभावी संस्थेच्या आणि आपल्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून अनेक नाविण्यपूर्ण असे सामाजिक उपक्रम राबवित असतात,हे अभिमानास्पद असून ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मायडी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा संपादक मारोती बा.शिकारे यांनी केले तर बहारदार सुत्रसंचालन शाहीर गौतम पवार यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन शंकरसिंह ठाकूर यांनी मांडले. या कार्यक्रमास सर्व पुरस्कारार्थी, त्यांचे कुटुंबिय, नातेवाईक, सर्व समाज बंधु भगिणी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.