भोकर/ सुभाष नाईक राष्ट्रीय एकता दिन व भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती दिनाच्या अनुषंगाने भोकर पोलीस ठाण्याच्या वतीने एकता दौड या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या मॅरेथॉन स्पर्धेला युवक व युवतीनी मोठा सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भारताचे गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या निमीत्त राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात येत असुन यांचे औचित्य साधत भोकरे पोलीस ठाण्याच्या वतीने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन दि.३१ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आले होते.ही मॅरेथॉन स्पर्धा वस्ताद लहुजी साळवे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भोकर पोलीस ठाणे असा या शहरातील मार्गाने आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत सोनारी येथील माधव तुकाराम मेहनतकर यांनी प्रथम क्रमांक, रमेश विश्वंभर बोईनवाड तळ्याचीवाडी ता. हदगाव यांनी दुसरा क्रमांक तर दिव्यरत्न रामा पाटील शनी मंदिर मुदखेड रोड, भोकर यांनी तृतिय क्रमांक पटकावला विजेत्यांना अनुक्रमे प्रथम पारितोषिक २१०० /- रुपये व पारितोषक, द्वितीय १५० ०/- व पारीतोषक,आणि तृतीय ११००/-रु. पारीतोषक व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या काही स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली आहेत.सदरील बक्षीस वितरण समारंभ भोकर पोलीस ठाण्याच्या आवारात पार पाडण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी एच.डी हाके हे होते.या विजेत्यांचा सत्कार व बक्षीस वितरण यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक अजित कुंभार हे होते. तसेच पोलिस उपनिरीक्षक शैलेंद्र आवटे, सहाय्यक पोलीस कल्पना राठोड, पोलीस उपनिरीक्षक कराड, पोलीस उपनिरीक्षक मोहन राठोड, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद बाचेवाड,परमेश्वर गाडेकर, रायटर आरेवार, लेखनिक, सीमा वचेवार, पो. हे. खिल्लारे, भीमराव जाधव, एकुलवार, वाघमारे, पवार आदी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.