आरे प्रशासनाचा अवैद्य बांधकामावर हातोडा.विलास पवार अनधिकृत बांधकामा बाबत संवेदनशील.

मुंबई दि (प्रतिनिधी) गोरेगाव पूर्वेतील आरे दुग्ध वसाहती मध्ये अनधिकृत बांधकामावर हातोडा पडला असून विविध ठिकाणी सुरक्षा अधिकारी श्री विलास पवार यांनी बेकायदा बांधकामावर कायमचा हातोडा चालवीन्याचे मनी धरले आहे.विलास पवार यांणी स्वतःच्या कालखंडात स्वतः पैसे घेऊन काही निवडक लोकांकडून लाखो रुपये घेऊन अनधिकृत बांधकामला चालना दिली असल्याचे बोलले जात होते. मात्र सर्वत्र होत असलेल्या तोडक कामगिरीने त्यांच्या वरील आरोप मोडून काढण्यात येत आहेत.या तोडक कारवाईमुळे त्यांची डागाळलेली प्रतिमा धुवून निघाली आहे. स्वतःला मोठे म्हणणारे काही लालची कार्यकर्ते व पत्रकारांना सुध्दा या तोडक कारवाईने चपराक बसली आहे.विलास पवार यांची सेवा निवृत्तीची वेळ आली असून 1/2 महिन्यात ते सेवा निवृत्त होणार असल्याचे कळते. काही सामाजिक कार्यकर्त्यांचे अनधिकृत काम करण्यास मज्जाव केल्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे कळते.विस्वासनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीवरून असे समजते कि, काही कार्यकर्त्याला अनधिकृत मोकळ्या जागेवर राजकीय दबावाला बळी न पडता बांधकाम करण्यास मनाई केल्यामुळे त्यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जातं आहे.आरे दूग्ध प्रशासनाचे सुरक्षा अधिकारी श्री विलास पवार यांनी इमाने इतबारे सेवा केली असून असे कळते कि जाणीवपूर्वक त्यांना काही कार्यकर्त्याकडून भ्रष्टाचाराच्या आरोपात गोवून त्यांच्या नोकरीच्या अंतिम काही दिवसापूर्वी त्यांच्या प्रशासनिक करिअर मलिन करण्याचा प्रयत्न होणार आहे.सध्या अधिकाऱ्यांना नाहक त्रास दिल्याच्या घटनामध्ये कमालीची वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे काही प्रामाणिक अधिकाऱ्यांना काम करणे अवघड झालेले आहे. यमु विलास पवार सारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची कोंडी होत असल्याचेही काही लोकांनी बोलून दाखवले.

Google Ad