राज्य उत्पादन शुल्क कोमात, अवैध दारू विक्री जोमात

थोडक्यात माहिती अशी की भोकर तालुका व शहर भागात विना परवाना भोकर शहरात मुदखेड रोड चौक मध्ये पण विना परवाना देशी दारूचे दुकान थाटात चालू आहे,भोकर शहरात बस स्थानक च्या आजुबाजुला व भोकर मध्ये अनेक ठिकाणी विना परवाना देशी दारूचे दुकान मोठ्या थाटामाटात सुरू आहे, दारूचे दुकान मोठ्या थाटामाटात सुरू आहे,या कडे अनेकवेळा महिन्यातून एकदा राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी खासगी गाडी घेऊन येतात. दारू विक्री करणार्यांना पकडतात. त्यांच्याकडून हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम घेऊन त्यांना त्याच ठिकाणी सोडून देतात. ही अवैध दारू व विना परवाना देशी-विदेशी दारू विक्री राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी विभाग यांच्या आशीर्वादाने जोमात सुरू आहे. याचा त्रास महिला, सर्वसामान्य नागरिक यांना होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकार्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांन कढुन होत आहे,
भोकर शहरासह देशी-विदेशी दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे. या विक्रेत्यांना दारू पुरवठा करण्यासाठी तालुक्यातील अनेक भागात पावडरपासून शिंदी बनवलेली तसेच ग्रामीण भागात हातभट्टीचे केंद्रही सुरू केले आहेत. ही दारू युरिया काही रासायनिक व केमिकल वापरून तयार केलेली असते. त्यातच खराब गूळ, इतर रासायनिक केमिकल यामुळे या दारूचा उग्र वास येत असतो. तसेच ही दारू कसल्याही भांड्यात, बाटल्यात, डब्यात व ट्यूबमध्ये भरली जाते. यामुळे ही दारू विषारी झाली आहे. ही हातभट्टी दारू ओढ्याला, डोंगरदर्या, झाडी यामध्ये राजरोसपणे उत्पादन केली जाते. याकडे कोणाचेही लक्ष नाही.भोकर शहरात देशी दारूचे दुकान मोठ्या थाटामाटात सुरू आहे,भोकर शहरात एक ते पाच ठिकाणी गल्ली-बोळात अवैध देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने थाटली आहेत. या दुकानदारांना राजरोसपणे दिवसा व रात्री चारचाकी, दुचाकी गाडीवरून देशी व विदेशी दारूचे बॉक्स पोच केले जातात. हा व्यवसाय सध्या राज्य उत्पादन शुल्क अधिकार्यांच्या आशीर्वादाने मोठ्या धुमधडाक्यात चालू आहे. या अवैध व्यवसायामुळे सर्वसामान्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तर अनेक लोक मरणही पावले आहेत. याला आशीर्वाद कोणाचा हा संशोधनाचा विषय आहे. जादा दराने दारुची विक्री होत आहे. तर विदेशी दारूही बनावट असल्याची चर्चा आहे. शिंदीची पाकीट 30 रुपयाला मिळते. ही दारू स्वस्त मिळत असल्याने तलफ भागविण्यासाठी सर्वसामान्य दारू पिणार्यांनाही परवडते. पण ही देशी दारू विषारी आहे.याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन त्यांच्या वर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.