राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार जोपासले तर आदर्श गावाची निर्मिती होईल- उपविभागीय अधिकारी मेंगशेट्टी

भोकर (तालुका प्रतिनिधी) राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीते मधून आदर्श गाव कसा असावा ही संकल्पना मांडली त्याचबरोबर गावाची एकता, संघटन, जातीभेद निर्मूलन, व्यसनमुक्ती, देशभक्ती अशा विषयाची जीवनभर जनजागृती केली त्यांचे विचार जोपासले तर आदर्श गावाची निर्मिती होईल असे विचार भोकरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी भोकर येथील ग्राम जयंती उत्सवात बोलताना मांडले.
भोकर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक समिती आश्रमात 30 एप्रिल रोजी ग्राम जयंती उत्सव साजरा करण्यात आला त्यानिमित्त सामुदायिक प्रार्थना किर्तन राष्ट्रीय भजन असे कार्यक्रम झाले1 मे रोजी झालेल्या सांगता समारोहात उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आज गावागावात रुजणे गरजेचे आहे असे विचार मांडले, तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी गावाची स्वच्छता सुंदरता एकता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारामुळे टिकून राहील असे मत व्यक्त केले, उमरी येथील प्रतिष्ठित व्यापारी विजय आप्पा उत्तरवार यांनी या कार्यासाठी पुढाकार घेत असून गावागावांमध्ये तुकडोजी महाराजांचे विचार पोहोचले पाहिजे असे मत मांडले नगराध्यक्ष भगवानराव दंडवे यांनी ग्रामगीता हा ग्रंथ वाचून कृतीमध्ये आणायचा असल्याचे मत व्यक्त केले, प्रास्ताविकात समितीचे सहसचिव बी.आर.पांचाळ यांनी भोकर हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रचाराचे मराठवाडा स्तरीय केंद्र बनावे असे विचार मांडले या कार्यक्रमास स्मारक समितीचे अध्यक्ष बापूराव पा. सोनारीकर, उपाध्यक्ष बालाजी पाटील, भाऊसाहेब बराटे,नगरपरिषद उपाध्यक्ष दिलीपराव सोनवडे, नगरसेवक डॉ. बालाजी बिलरवार, विठ्ठल पा.धोंडगे, गणेश यशवंत कर, गौतम कसबे, डॉ.मनोज गीमेकर,अविनाश वाघमारे, दिनेश लक्षटवार, सिद्धार्थ पिटलेवाड यांच्यासह गुरुदेव सेवा मंडळाचे गोपाळ महाराज मुळझरेकर, शेषेराव पा.लगळुदकर, गंगाप्रसाद जामदरीकर,गोविंद माऊली पार्डीकर, गोविंद पा.टेंभीकर, सुभाष पा. कोळगावकर, प्रकाश मामा कोंडलवार, पत्रकार बालाजी नारलेवाड, शेतीनिष्ठ शेतकरी श्रीधरराव गुंजकर,देवराव बोंडलेवाड, गणेश गुरुजी दुमलवाड, बी.ए जाधव, रामराव पाटील, माऊली पाटील, हनमनलू बडगर,अवधूत राजुरे यांच्यासह सर्व गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply