भारत देश टिकवायचा असेल तर संविधानिक मूल्यांचा मार्ग स्वीकारणे अपरिहार्य आहे :- ॲड सिध्दार्थ कदम
भोकर (प्रतिनिधी) भोकर तालुक्यातील मौजे इळेगाव येथे राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व विश्वदिप महाकारुणिक तथागत बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी“स्वातंत्र्य भारताचा आत्मा ज्यांनी घडवला,त्या व्यक्तिमत्त्वाची महानता वेगळी सांगण्याची गरज नाही लोकांनी लोकांसाठी अर्पण केलेले हे जगातील पहिले संविधान आहे भारत देश टिकवायचा असेल तर संविधानिक मूल्यांचा मार्ग स्वीकारणे अपरिहार्य आहे,”असे प्रतिपादन अध्यक्षीय समारोप करताना वंचित बहुजन आघाडीचे ऍड. सिद्धार्थ कदम यांनी इळगाव येथे केले कार्यक्रमाची सुरुवात तथागत बुद्ध व राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनाने मान्यवरांच्या हस्ते झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे ॲड.सिद्धार्थ कदम होते.यावेळी पत्रकार जयभीम पाटील,भिम टायगर सेनेचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद गायकवाड,सुभाष तेले, ॲड. प्रसेनजीत एडके,विक्रम क्षिरसागर, कांतीलाल जोंधळे,प्रमोद गौवंदे,राष्ट्रवादी किसान सभा तालुका अध्यक्ष अवधुत पाटील इळेगावकर,मनोज शिंदे,सुजीत दंडे,सतीष जाधव,राहुल सोनकांबळे,अशित सोनुले आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकट मध्ये घेणे
राष्ट्रनिर्माते डॉ आंबेडकर यांचे विचार सीमा ओलांडून जगाला दिशा देणारे आहेत :- भिम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष शंकरदादा शेळके
शंकरदादा शेळके यांनी आपल्या भाषणात सांगितले की,“राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सीमा ओलांडून जगाला दिशा देणारे आहेत.त्यामुळेच त्यांची जयंती आज जागतिक स्तरावर साजरी केली जाते.” कार्यक्रमात मानवतेचा सार्वभौम संदेश अधोरेखित करण्यात आला.असे शेवटी शेळके म्हणाले
चौकट मध्ये घेणे
भिम जयंतीत हुंलगुंडे कुटुंबाकडून संविविधान प्रास्तावीका भेट
तालुक्यातील मौजे इळेगाव येथे प्रथम सत्रात २७ एप्रिल रोजी राष्ट्रनिर्माते डॉ आंबेडकर यांची जयंती आदर्शपूर्ण वातावरणात, शांतता व उत्साहात साजरी करण्यात आली दुसऱ्या टप्पात ता १ मे २०२६ रोजी तथागत भगवान बुद्ध जयंती दिनी व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला सदरील कार्यक्रमात या वर्षी गावातील कृषी अधिकारी बळवंत हुलगुंडे पाटील इळेगावकर या कुटुंबाकडून संविधान प्रस्ताविका वाटप करून एक नवा आदर्श निर्माण केला
कार्यक्रमाचे सुंदर असे सुत्रसंचलन पत्रकार राजेश चंद्रे यांनी केले तर आभार पोलीस पाटील मनोहर खंदारे यांनी केले व्याखांनानंतर रात्री भिम-बुद्ध गीतांचा जागर रंगला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भिमशाहीर आम्रपाली खराटे (पुसदकर) व त्यांच्या संचासह युवा गायक विकास राजा गायकवाड (नांदेड) यांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला बहार आली कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष आकाश खंदारे, विलास बामने , विलास देवके , प्रविण खंदारे , सुरज हनमंते ,अतुल खंदारे व गावातील बौद्ध उपासक उपासिका आदिनी परिश्रम घेतले परिसरातील धम्मबंधूंची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
