अवैध दारु विक्रिसाठी भोकर शहर सूरक्षित! तहसील कार्यालयासमोर व बस स्थानक समोर मटका बोळी गल्लीत अवैध देशी दारू विक्री…

भोकर(प्रतिनिधी)शहरात पहाटे पासून रात्री उशीरापर्यंत अवैध दारु विक्रि सूरु असताना राज्य उत्पादन शूल्क विभाग मात्र झोपेचं सोंग घेत असुन मोठ्या प्रमाणात दारु विक्रि होत असल्यामूळे अवैध दारू विक्रिला भोकर शहर सूरक्षित असल्याची चर्चा होत आहे.
भोकरमध्ये अधिकृत परवाना असलेली देशी दारुची दूकाने तर काही बार अँन्ड रेस्टाॅरन्ट चालतात परवानाधारकांना शासनाकडून विक्रीचे नियम व अटी घालून दिले दूकाने उघडण्याची व बंद करण्याची वेळ ठरवून दिलेली आहे.अवैध दारु विक्रि करणार्‍यांना कोणताही नियम नसतो ना कूणाची भिती रात्री बेरात्री आपली दूकाने सूरुच ठेवली जातात व याठिकाणी दारुड्यांना कोणत्याही वेळेला दारु उपलब्ध होत असल्याचे निदर्शनास येत आहे, शहरातील व शहरालगत मटन खानावळ व धाब्यावरील अवैध दारु विक्री करणार्‍यांवर योग्य ती कारवाई करून होत असलेली दारु विक्री थांबवण्याची मागणी शहरातील बार अॅन्ड रेस्टाॅरन्ट असोशिएशन कडून मागील काही दिवसापूर्वी संबधित विभागाकडे करण्यात आली होती संबधित विभागाकडून बार अॅन्ड रेस्टाॅरंंट चालकांच्या मागणीकडे सोयीस्कर दूर्लक्ष करण्यात आल्याने अवैध दारु विक्रि करणार्‍यांचे मनोबल वाढले आहे. शहरात खूलेआम अवैध दारु विक्रि होत असल्याचे पहावयास मिळते उत्पादन शूल्क विभागाचे संबधित कर्मचारी अवैध दारु विक्रेत्यांकडून दरमहा हफ्ते वसूली करित असल्याची चर्चा असून हफ्तेखोरीमूळे मटनखानावळ आणि धाब्यावर सर्रासपणे अवैधरित्या दारु विक्रि होत असल्याचे पहावयास मिळते.संबधित विभागातील कर्मचारी व दारु विक्रेते यांचे अर्थिक हित संबध असल्याने हा अवैध दारु विक्रिचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावल्याचे पहावयास मिळत आहे.वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष घालून होत असलेली अवैध दारु विक्रि त्वरीत बंद करण्यात यावी अशी मागणी सर्वत्र होत आहे.

Leave a Reply