चिरनेर चांदायली वाडी केल्याचा माळ प्राथमिक शाळेत शालेय वस्तू आणि जेवण वाटप

उरण दि 18(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील चिरनेर केल्याच्या माळ येथील शाळा ही दुर्मिळ दुर्बल घटकातील आदिवासी बांधव यांच्यासाठी वीस वर्षांपूर्वी स्थापन केली आहे. या शाळेतील लहान मुले अतिशय मेहनत व प्रामाणिकपणे कष्ट करून जिद्दीने शिक्षण घेत आहेत. त्यांना अनेक दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटना आणि अनेक कंपनीकडून शालेय वस्तू आणि इतर गोष्टी नेहमी दिल्या जात असतात.सामाजिक बांधिलकी जपत डीपी वर्ड कंपनी यांच्यावतीने शालेय वस्तू आणि जेवण देण्यात आले.यावेळी या कार्यक्रमासाठी कंपनीचे असिस्टंट मॅनेजर सुरज ठाकूर, मॅनेजर शिवांगिनी सिंग, एकज्युकेटिव्ह सुनीता म्हात्रे, उरण विधानसभा युवक इंटक अध्यक्ष राजेंद्र भगत, मॅनेजर पुरुषोत्तम रेडी, राजेश रेड्डी, नितीन सर , जितेंद्र सर,जितेंद्र ठाकूर, अविनाश लोंढे, शाळेचे शिक्षक प्रतिभा लहासे, शिक्षक प्रवीण पाटील, शाळेचे अध्यक्ष रोशन कातकरी, विजया कातकरी आणि कर्मचारी विजय कातकरी, नागरिक आणि विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक प्रविण पाटील यांनी केले.डीपी वर्ड कंपनी मधील सर्व मॅनेजमेंट आणि कर्मचारी तसेच पाहुण्यांचे यावेळी शाळा व्यवस्थापन कमिटी व शिक्षक कर्मचारी वर्गा तर्फे मनापासून आभार मानण्यात आले.

Google Ad