भोकर ( तालुका प्रतिनिधी) सार्वजनिक गणेश मंडळ भोकर यांच्या वतीने विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवून डीजे मुक्त मिरवणूक काढल्या बद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांच्या हस्ते गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
भोकर येथिल सार्वजनिक गणेश मंडळाने मागील 20 वर्षांपासून सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवून चांगला आदर्श निर्माण केला तीच परंपरा आजही चालू आहे भागवत कथा,शिवपुराण कथा,,रामायण कथा व रात्री नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन,रक्तदान शिबीर,आरोग्य शिबीर,मोतीबिंदू तपासणी शिबीर,व्याख्याने,विविध स्पर्धा असे कार्यक्रम घेण्यात आले चालू वर्षी दिवसा हरिकथा रस महोत्सव व रात्री ज्ञा्नेश्वरी भाव निरूपण कथा, आरोग्य शिबीर,मोतीबिंदू तपासणी शिबीर,सर्वारोग निदान शिबीर,कीर्तन असे धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात आले, डीजे मुक्त मिरवणूक काढण्यात आली विसर्जनाच्या दिवशी 12 हजार भाविकांसाठी महाप्रसाद करण्यात आला या सर्व उपक्रमामुळे समाज प्रबोधन झाले या उपक्रमाची दखल घेऊन 18 सप्टेंबर रोजी नांदेड येथे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला,यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांची उपस्थिती होती.मंडळाचे अध्यक्ष देवानंद धूत,उपाध्यक्ष बी.आर. पांचाळ, सचिव डॉ.किरण पांचाळ, कार्याध्यक्ष सारंग मुंदडा, ज्येष्ठ मार्गदर्शक रामदेव दोडिया यांच्यासह व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक आदींनी गणेशोत्सव कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.