भोकर येथील रक्तदान शिबिरात 122 रक्तदत्त्यांनी केले रक्तदान…

भोकर ता.प्र./ जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान च्या वतीने करण्यात आलेल्या महारक्तदान शिबिर संकल्पानुसार भोकर तालुक्या कडून झालेल्या रक्तदान शिबिरात १२२ रक्त दात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग नोंदविला.
सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान च्या वतीने 4 जानेवारी ते 19 जानेवारी 2025 पर्यंत महाराजां शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान भोकर तालुक्याच्या वतीने गुरुवार दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी तहसील कार्यालयासमोर मोठ्या आनंदी उत्सवात शिष्य भक्त साधक अनुयायी यांच्या उपस्थितीत सकाळी आठ वाजता सर्वप्रथम जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजा करून प्रतिमेस हार अर्पण करण्यात आला त्यानंतर गजर घेत सदरील शिबिराचे उद्घाटन भगवानराव दंडवे भोकर विधानसभा समन्वयक भाजपा श्री संप्रदाय तालुका अध्यक्ष गंगाधर पडवळे व सर्व पदाधिकारी यांच्या शुभहस्ते करून रक्तदान सुरुवात करण्यात आली.
या शिबिरास पोलीस निरीक्षक अजित कुंभार, पोलीस उपनिरीक्षक जाधव साहेब, जिल्हाध्येक्षमुंडकर सर,जिल्हा ब्लड कॅम्प प्रमुख रवी शहाणे सामाजिक कार्यकर्ते डॉ. व्यंकट माने,संपादक उत्तम बाबळे सह सर्व पत्रकार,काँग्रेस चे तालुका अध्यक्ष गिविंद बाबा गौड,माजी गटशिक्षणाधिकारी माधव वाघमारे, पत्रकार सुधांशु कांबळे यांच्यासह शहरातील तालुक्यातील अनेक पक्षाच्या पदाधिकारी, शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी भेट दिली तर एकूण १२२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते.यात १७ महिला रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे रक्तदान यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष गंगाधर पडवळे,सोमनाथ पांचाळ कॅम्प प्रमुख ज्ञानेश्वर बेरदेवाड,सुशांत बारडे,संतोष वट्टमवार,राजू बंडावार,इरवंत पांचाळ,परमेश्वर बोईनवाड,साईनाथ बंडोड सुरेश डुरे,संदीप बुट्टनवाड,दत्ता डुरे,गोविंद डुरे, विजय कापसे,ज. न. म. प्रवचनकार अक्कलवाड सर,रामदास बेरदेवाड,भीमराव पाटील,भगवानराव देशमुख, गंगाधर सोमनवार,अर्जुन कोलुरे,,सचिन पांचाळ, माधव राचेवाड,पंडित राचेवाड, शंकर कुट्टेकर, लक्ष्मणसिंह तिलकचंद, महिला तालुका अध्यक्ष विद्याताई तिलकचंद,गुलाबसिंह ठाकूर,निर्मला जाधव,सिंधुताई बंडोड,योगिता पांचाळ, गंगाताई कुट्टेकर,ललिताबाई शिंदे,वर्षा वट्टमावर, अरुणा जोगदंड,रेखा वट्टमवार,वैजयंती सोमनवार,रुखमीणबाई देशमुख, रुक्मिणी सोनटक्के,भारतबाई कल्याणकर,प्रयागबाई नागमोड,जयश्री कोलूरे,अनिता बोईनवाड, सुरेखा सोळंके, महानंदा न्यारमवाड,सुरेखा मिश्रा आदींनी परिश्रम घेतले.
तर या शिबिरासाठी आरोग्य तपासणी डॉ. यु. एल. जाधव,रक्तातील हिमोग्लोबिन ची तपासणी डॉ.अनिल जाधव यांनी करून सहकार्य केले.शिबिराचे रक्त संकलन डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील डॉ.अंकिता लोहिया ( रक्त संक्रमण अधिकारी )
डॉ. पूजा लक्षटवार. ( रक्त संक्रमण अधिकारी ),श्री बालाप्रसाद भालेराव,श्रीशरद अवचार,श्रीप्रकाश,सुरनर श्रीमती देसाई राही, श्री निवघे पी, श्री दीपक शिंदे,श्यामराव जोंधळे,बशीर सय्यद,परमेश्वर राठोड,औराळे राजू यांनी केले.