शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावल्याने शिवसैनिकांचा किनी एसबीआय बँकेवर जवाब दो आंदोलन..

भोकर/ सुभाष नाईक
एकीकडे शासन शेतकऱ्यांना शेतीसाठीच्या गरजा पुर्ण व्हाव्या म्हणून अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक मदत करते पण बॅंका मात्र थकित कर्जाच्या नावाखाली आलेल्या आर्थिक अनुदानाच्या शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावुन पिळवणूक करत असल्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून किनी एसबीआय बँकेवर जवाब दो आंदोलन करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.माय मरु देत नाही बाप भीक मागू देत नाही असी अवस्था सध्या शेतकऱ्यांची असुन यांच्या प्रश्नांसाठी कोणीच वाली नाहीत.परंतु शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष मात्र शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन, रास्ता रोको, ढोल बजाओ आंदोलन करत शिवसैनिक रस्त्यावर लढतात पण दुसरा कोणताही पक्ष शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही.भोकर तालुक्यातील मौजे किनी येथे एसबीआयची बॅंकेची शाखा आहे.या शाखेत होल्डच्या नावाखाली शेकडो शेतकऱ्यांना त्रास देण्याचा कार्यक्रम चालू आहे. त्यामुळे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने दि.४ जुन रोजी शेतकऱ्यांच्या तक्रारी वरुन तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन विनाकारण शासनाने दिलेल्या पि.एम.किसान,पिक विमा, आर्थिक मदत आदी अनुदानाचे पैसे बॅंक खात्यावर पडतात.पण बॅंकेने थकित कर्जाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावुन पैसे देणे बंद केले.यामुळे बँकेत व्यवहार करणे अवघड होऊन बसले आहे.असे निवेदनात म्हटले. यानंतर शिवसेना उबाठा कडुन किनी येथील बँकेत जाऊन होल्ड लावण्याचे कारण विचारत जवाब दो आंदोलन केले आहे.या बँकेचे व्यवस्थापक संजय देवरे व फील्ड ऑफिसर स्वप्नील टारफे यांना शिवसैनिकांनी होल्ड लावुन शेतकऱ्यांना त्रास का देता व अनुदान थांबण्याचा तुम्हाला काय अधिकार म्हणत प्रश्नांचा भडीमार केला तेव्हा शाखा व्यवस्थापन संजय देवरे लहान मुलासारखे टेबल वाजवित लोकांना चिड आणत होते.शेवटी माजी तालुकाप्रमुख माधव वडगावकर यांनी जिल्हा प्रबंधक यांना या विषयी फोन करून विचारले असता व्यवस्थापक देवरे यांना अनुदानाच्या रकमेवर होल्ड लावुन नका असे स्पष्ट सांगितले तरी हा संजय देवरे ऐकण्यास तयार नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्रास देण्याचे काम चालू असुन या व्यवस्थापकावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक अँड परमेश्वर पांचाळ, जिल्हा उप-संघटक सुभाष नाईक किनीकर, माजी तालुकाप्रमुख माधव पा.वडगावकर,शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार, जेष्ठ शिवसैनिक साहेब पाटील भोंबे,माजी तालुकाप्रमुख प्रदीप दौलतदार, जेष्ठ नेते लक्ष्मणराव बुचन्ना चटलावार, निवृत्त अधिकारी गंगाधर पांडलवार,सर्कल प्रमुख गोविंद गिरी, रमेश महागावकर, पञकार दत्ताभाऊ बोईनवाड, काँग्रेसचे युवा नेते रविंद्ररेड्डी बोंतलवाड, नरेशरेड्डी सुरकुंटवाड, जेष्ठ शिवसैनिक गंगाधरराव तुराटीकर, नविनरेड्डी मामीडवाड, लक्ष्मणदादा, लिंगारेड्डी दोडीकिंदवाड, दतराम शिंदे, भोजन्ना यंडलवाड आदी उपस्थित होते.