सावली प्रतिष्ठानच्या वतीने भोकर मध्ये कृषी दिनानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण

भोकर (तालुका प्रतिनिधी)केवळ झाडे लावायचीच नसून ती जगली पाहिजे यासाठी काम करणाऱ्या सावली प्रतिष्ठानच्या वतीने 1 जुलै 2024 रोजी कृषी दिनानिमित्त भोकर मध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
भोकर शहरासह ग्रामीण भागात देखील वृक्षारोपण करून ती जगली पाहिजे यासाठी गेली 4 वर्षापासून सावली प्रतिष्ठान वृक्षारोपणाचे काम करते त्यांच्या वतीने लावण्यात आलेले वृक्ष आज सावली देणारी झाले आहेत,उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगसेट्टी,तहसीलदार सुरेश घोळवे यांच्या मार्गदर्शनानुसार 1 जुलै कृषी दिनाचे औचित्य साधून संत नामदेव महाराज मंदिराच्या जागेवर,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम व स्मशानभूमी या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला अंगणवाडीच्या बाजूला मोकळ्या जागेत सुद्धा वृक्षारोपणासाठी जागा तयार करण्यात आली आहे तिथे वृक्षारोपण करण्यात येणार आहे यावेळी सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष बी.आर.पांचाळ,उपाध्यक्ष बाबुराव पाटील,नगर परिषदेचे कर्मचारी जावेद इनामदार,साहेबराव मोरे, संत नामदेव महाराज समितीचे अध्यक्ष गणेश श्रीरामवार कोषाध्यक्ष जनार्दन पोटपल्लेवार,गणेश मगीरवार ,अनिल मगिरवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते भोकर विचार विकास मंच,सेवा समर्पण परिवार,एक झाड एक वृक्ष मित्र मंडळ यांच्या वतीने देखील वृक्षारोपणास सुरुवात करण्यात आली आहे