भोकर रेल्वे संघर्ष समिती तर्फे सिकंदराबादचे रेल्वे अधिकारी CPE. यांना निवेदन.रेल्वे अधिकाऱ्याचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी लवकरच आंदोलन-पत्रकार अहेमदभाई करखेलीकर.
भोकर-भोकर रेल्वे संघर्ष समिती तर्फे रेल्वे दिनांक 23 मार्च 2023 रोजी रेल्वेचे अधिकारी भोकर रेल्वे स्टेशनवर आले असता. अधिकाऱ्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष पत्रकार अहमदभाई करखेलीकर यांनी खालील मागण्या लवकरच मान्य झाले नाही तर रेल्वे रोको आंदोलन करण्यात येईल अशा इशारा रेल्वे अधिकाऱ्यांना दिला.नागपुर हून मुंबई जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस बंद झाली आहे ती चालू करण्यात यावी. मुदखेड- अदिलाबाद डबल लाईन करण्यात यावी, साप्ताहीक- काजीपेठ मुंबई नियमित करण्यात यावी,तपवोन एक्सप्रेस अदिलाबादहून सोडण्यात यावे.हैद्राबाद जाण्यासाठी दुपारी अदिलाबाद- हैद्राबाद रेल्वे गाडी चालू करण्यात यावी,आदिलाबाद – पुणे रेल्वे चालू करण्यात यावी .प्लॉट मार्फ 2 वर नाली खोदून तसेच ठेवण्यात आलेले आहे ते नाली बांधकाम करण्यात यावे. दोन वर स्टेशन बांधून तिकीट खिडकी चालू करण्यात यावी. भोकर मोठे बाजार पेठ आहे. प्रवशांची संख्या लक्षात घेऊन संत्रागाच्छी.पाटना.कोल्हापुर या रेल्वे एक्सप्रेसला भोकर येथे थांबा देण्यात यावे. प्लॅटफॉर्मवर दोन वर पाण्याची व्यवस्था करण्यात यावी दोन मीटर उंचीच्या संरक्षण भीत बांधण्यात यावे. गार्डनच्या झाडाला पाण्याची व्यवस्था करण्यात यावे. भोकर रेल्वे स्टेशन पाडून नवीन आधुनिक रेल्वे स्टेशन बांधण्यात यावे. यासह अनेक मागण्याचे निवेदन भोकर रेल्वे संघर्ष समितीने सिकंदराबाद चे रेल्वे अधिकारी PCE. नांदेड डिव्हिजनचे सहाय्यक डीआरएम मीना साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी स्टेशन मास्टर शिवकुमार. सहाय्यक स्टेशन मास्टर अमित झा. स्टेशन मास्टर अ