मालवाहू ट्रक आणि ऑटोची समोरासमोर धडक चार जणांचा जागेवरच मृत्यू,इतर गंभीर जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती..

मुदखेड येथे आज सकाळी दहा वाजता मुदखेड तालुक्यातील इसार पेट्रोल पंपा जवळील वळण रस्त्यावर नांदेड हुन भुतकर येत असलेल्या मालवाहू ट्रक आणि नांदेड कडे मुखेड होऊन जात असलेल्या ऑटोची समोरासमोर धडक म्हणून जागेवरच चार लोकांचा दुर्दैवी अंत झाल्याची माहिती असून इतर सात गंभीर जखमींना पुढच्या उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात पाठवल्याची माहिती त्या ठिकाणी उपस्थित घटनास्थळी प्रत्येक्ष दर्शनी सांगितले.

मुदखेड तालुक्यात मागील पाच महिन्या खाली अशाच एक अपघात होऊन त्या अपघातामध्ये तीन जणांचा दुर्दैवी अंत झाला होता आणि दिनांक 30 मार्च 2023 रोजी आणखी मुदखेड तालुक्यावर निसर्गाचा घाला झाला असून त्यात चार जणांचा मृत्यू झाला असून त्यात महिला सरोजा बाई, अंजली बाई, जोयल आणी पुंडलिक बळीराम कोल्हटकर राहणार सावरगाव माळ तालुका भोकर चारही मृत्यू पावलेल्या लोकांना मुदखेडच्या ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदनासाठी आल्याची माहिती असून हा शहरात अपघाताबद्दल हळूहळू होत असताना मुदखेड तालुक्यात अपघातांची संख्या वाढल्याचे दबक्या आवाजात लोकांच्या होताना दिसत आहे घटनेची माहिती मिळतात मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सौभाग्यवती कमल शिंदे यांच्यासह मुदखेड पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते घटनेची माहिती मिळताच मुदखेड शहरातील नागरिकांनी अपघातस्थळी मृत्यू पावलेल्या लोकांना अंबुलन्स मध्ये टाकण्यासाठी शेख रिजवान, शेख इमरान भंगारवाले,शेख मोहसीन बागवान, खाजाभाई कुरेशी,ऋषिकेश पाटील पारवेकर, भीमराव पाटील कल्याणे लोकांनी अपघात स्थळी मदत केली

Google Ad