डाभा येथील बॅटरी चोरणाऱ्यां दोन भामट्या चोरांना फर्दापूर पोलीस केले जेरबंद …

सिंघम सपोनि भरत मोरे यांची धडाकेबाज कारवाई चार तासात लावला शोध…

सोयगाव प्रतिनिधी / विजय पगारे :सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत मोरे यांनी फर्दापूर पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यानंतर परिसरात गुन्हेगार झाले भयभित..
सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलीस स्टेशन अंतर्गत डाभा येथील बटरीचोरीचे प्रमाण जास्त वाढले होते . या करिता पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी जिल्हयातील चोरी करणा-याचा चोरटयांचा शोध मोहीम हाती घेवून त्यांना जेरबंद करण्याबाबत सुचना सर्व प्रभारी अधिकारी यांना दिल्या आहेत.
यावरुन सिल्लोड उपविभागिय पोलीस अधिकारी डॉ. विजय मराठे यांनी अशा गुन्हयांचा जलद गतीने तपास करण्याबाबत मार्गदर्शन करुन गुन्हे उघडकिस आणुन अशा घटनांना आळा बसवणे कामी मार्गदर्शन केले. यावरुन फर्दापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत मोरे यांनी तात्काळ तपास कामी पोलीस पथकासह फर्दापुर शिवारातील नांदातांडा गांवामध्ये गु.र.नं. ४२/२०२३ कलम भादवी ३७९ मध्ये फिर्यादी नामे प्रा.मदन मुरलीधर डोखळे डाभा ता. सोयगांव यांचे टॅक्टरची बॅटरी चोरी झालेची फिर्यादीवरुन गुन्हा रजिस्टर दाखल केल्याने त्यांच्या तपासात सपोनि भरत मोरे व त्यांचे सहकारी पोलीस पथकासह भ्रमन करिता असतांनाच एका गोपणीय खबऱ्या कडून बातमी मिळाली की, नांदतांडा मधील एका इसमाने सदरची चोरीची बॅटरी अल्प दरात विकत घेतल्यांची माहिती मिळताच त्याबातमीची त्यांनी तात्काळ विनाविलंब खात्री केली असता, आरोपी नामे किशोर मोरसिंग चव्हाण (वय २८ वर्ष) व्यवसाय शेती व मजुरी रा. नांदातांडा ता. सोयगांव यांने खरेदी करुन तो त्यांच्या स्वतः च्या मालकीच्या टॅक्टरमध्ये वापरत होता याची खातरजमा करूनच सपोनि भरत मोरे व पोलिस पथकांने वरील इसमांस ताब्यात घेतले त्याने गुन्ह्याबाबत कबुली दिली की, सदरची बॅटरी ही आदित्य तुकाराम राठोड रा. नांदातांडा यांनीच चोरी करुन त्याला विकलेली आहे सदर गुन्हयात अटक आरोपी यांचे कडुन १०,०००/- किंमतीची Global कंपणीची बॅटरी ट्रॅक्टरी वापण्यात येणारी हा मुददेमाल मिळाला असल्यांने तो जप्त करण्यात आला आहे. सदर ची कार्यवाही पोलीसांनी ४ तासांच्या आत करुन वरील दोन्ही आरोपी पकडले यांना जेरबंद केलेले आहे. सध्या आरोपीतांना न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कस्टडी दिलेली आहे, सदर दोन्ही आरोपी पोलीस कस्टडीमध्ये असुन पोलीसामार्फत त्यांनी आनखी कोणी साथीदार आहेत काय ? तसेच चोरीचा माल घेतलेले अजुन काही इसम आहेत काय ? याबाबत तपास पुढील तपास फर्दापूर पोलीस करीत आहेत.नमुद कार्यवाई ही सपोनि भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मिरखॉ तडवी, मसुद तडवी, निलेश लोखंडे, पोकॉ, अंकुश भवर, पो.कॉ.प्रकाश कोळी, भरत कोळी, सतिश हिवाळे, प्रदिप बेदरकर, महीला पो का कल्पना चावे यांनी मिळून कारवाई केलेली आहे.

Google Ad