बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांना संत भोजलिंग काका जीवन चरित्र गाथा भेट

भो क र ( तालुका प्रतिनिधी)
विश्वकर्मा वंशीय समाजाचे संत वारकरी संप्रदायाचे भक्त भोजलींग काका यांच्या जीवन चरित्रा वरील गाथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे चे महा संचालक सुनील वारे यांना भेट देण्यात आला.
संत भोजलिंग काका हे संत ज्ञानेश्वर महाराज व त्यांच्या चारही भावंडांचा सांभाळ केला पांडुरंगाच्या मंदिरात त्यांचे वास्तव्य होते ते विठ्ठलाचे भक्त होते मात्र त्यांचा इतिहास द डवला गेला पंढरपूर येथे त्यांची समाधी आजही दुर्लक्षित आहे परभणी जिल्ह्यातील पोहंडूळ हे त्यांचे जन्मगाव आहे अशा या महान संतांचे चरित्र जगासमोर यावे महाराष्ट्रातील संत विभुतींच्या यादीमध्ये त्यांचे नाव असावे म्हणून विश्वकर्मीय समाजाच्या वतीने प्रयत्न केले जात आहे, बार्टीच्या वतीने संत भोजलिंग काका संत साहित्य संमेलन घेण्यात यावे अशी मागणी करून बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांना संत भोजलिंग काकांचे जीवन चरित्र ग्रंथ भेट देण्यात आला व माहिती देण्यात आली यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराम पांचाळ, एड. बी.आर. कलवले, पंढरीनाथ केंद्रे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Google Ad