बनावट सही करुन नामनिर्देशन पत्र मागे घेण्यावर बिआरएस चा आक्षेप

भोकर(प्रतिनिधी)कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकिच्या नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेकांनी आपली उमेदवारी मागे घेतली व्यापारी मतदार संघातून गोविंदप्रसाद धूत हे आपले उमेदवारी अर्ज दाखल केला होता नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी गोविंदप्रसाद बाहेरगावी गेले होते त्यांची बनावट सही मारुन उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न झाला परंतू बिआरएस चे नागनाथराव घिसेवाड यांनी यावर आक्षेप नोंदवला घिसेवाड यांनी घेतलेल्या आक्षेप अर्जावर तात्काळ निर्णय घेत गोविंद प्रसाद धूत यांचा अर्ज कायम ठेवण्यात आला यावेळी निवडणूक निर्णय अधिकार्‍यासमोर काँग्रेस कार्यकर्ते व बिआरएस यांच्यात शाब्दीक बाचा बाची झाली थोडा वेळ गोंधळ निर्माण झाला भाजपा काँग्रेस बिआरएस मध्ये लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे काँग्रेसकडून उमेदवारी न मिळालेले उमेदवार आपले अर्ज मागे घेतले अनेकांना अश्वासन देवून अखेरच्या दिवशी अनेकांनी नाराज होवून परतले नाराजीचा फटका निवडणूकित काँग्रेस पक्षाला बसणार असल्याची चर्चा असून याचा फायदा बिआरएस व भाजपाला होण्याची चर्चा राजकिय वर्तूळात आहे.महाविकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेची यूती सामंजस्याने होईल असे वाटत होते परंतू शिवसेनेचे माजी जि.प.सदस्य सूनिल चव्हाण माजी संचालक सतिश देशमूख नंदू पा.कौठेकर हे उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याची माहीती असून राष्ट्रवादीचे दोन उमेदवार असल्याची माहिती आहे.जागा वाटपावरुन आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा आहे.

Google Ad