तीर्थक्षेत्र गणेश मंदिर पाळज येथे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडून सुरुवात

Adiwasi kranti Marathi news 21/04/2023

भोकर (प्र) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची लढत तिरंगी होणार या निवडणुकीमध्ये भाजपा, शिवसेना युती असुन या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे निष्पन्न झाले महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी मिळून महाविकास आघाडीची युती होणार होती पण अंतिम क्षणी

युतीत बिघाडी झाल्याने याचा जोरका झटका धीरे से लगे म्हणीनुसार काँग्रेस पक्षाला झटका बसण्याची दाट शक्यता आहे .
भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीच्या प्रचारार्थ आज दिनांक 21 4 2023 रोजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते तीर्थक्षेत्र पाळज येथील गणेश मंदिरात नारळ फोडून प्रचारास सुरुवात करण्यात आली, यावेळी खेड्यापाड्यातील व पाळज येथील सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन सोसायटी मेंबर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक गणेश पाटील कापसे यांनी केले या उपस्थित सभेमध्ये भोकर भाजपा तालुका अध्यक्ष किशोर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शेतकऱ्यांच्या हितासाठी व कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेला मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी भारतीय जनता व शिवसेना युतीच्या पार्टीला बहुमताने विजयी करा असे आवाहन आपल्या मनोगतात विशद केले. जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी उपस्थित जनसमुदायाला तन मन धनाने कामाला लागा असे आवाहन केले, कुणालाही घाबरायची गरज नाही पक्ष तुमच्या पाठीशी आहे मन्याडचा वाघ तुमच्या पाठीशी असल्याने काही घाबरायची गरज नाही असे आव्हान उपस्थित जनतेला त्यांनी केले,
शेवटी अध्यक्ष भाषणात नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रताप पाटील चिखलीकर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की काँग्रेस पक्षाने आज पर्यंत अनेक निवडणुका पैशाच्या जोरावर जिंकलेले आहेत पण राजकारण करत असताना हे केवळ राजकारण पैशाच्या जोरावर चालत नसून ते विकासात्मक दृष्टिकोन समोर ठेवून जनतेचे काम केल्याने जनता त्या त्या विकासाच्या पाठीमागे धावून त्या उमेदवारास निवडून आणण्याचा प्रमाणिक प्रयत्न करत असतात, आपण सर्व तयारीनिशी निवडणुकीमध्ये उतरले पाहिजे कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीचा झेंडा तुम्ही फडकवा भोकर तालुक्यातील शेतकरी व सर्व सामान्य जनतेला प्रमाणिकपणे न्याय देण्याचा भारतीय जनता पार्टी व शिवसेना प्रयत्न करेल असे आवाहन त्यांनी उपस्थित जनतेला केलेले आहे पुढे बोलताना त्यांनी म्हणाले की 50 वर्षाची सत्ता भोगून नांदेड जिल्ह्यामध्ये एक किलोमीटर नॅशनल हायवे चा रस्ता त्यांनी केला का? जर त्यांनी केला असेल तर त्यांनी ह्या तीर्थक्षेत्र गणेश मंदिर पाळज येथे शपथ घेऊन सांगावे या उपस्थित जनतेसमोर दोन्ही काने धरून मी जनतेची माफी मागेल या केवळ पाच वर्षाच्या काळामध्ये सहा हजार कोटी रूपयांची नॅशनल हायवे नांदेड जिल्ह्यात आज काम चालू आहे हे केवळ सर्वसामान्य जनतेने भारतीय जनता पार्टीला निवडून दिल्यामुळे शक्य झाले आहे, यापुढेही असेच विकासात्मक कामे चालू असतील हे तुम्हाला अभिवचन देतो असे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आपल्या मनोगतात मनोगत व्यक्त केले.
चौकट
काँग्रेस पक्ष सोडून अनेक मान्यवरांचा भाजपामध्ये प्रवेश
सुभाष पाटील किन्हाळकर भुजंगराव पाटील भोसले दिलीप जाधव या मान्यवरांच्या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पार्टीला बळकटी मिळाली यामुळे सर्व पक्ष प्रवेश केलेल्या मान्यवरांचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमात भाजपा युवा जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ देशमुख. प्रदेश कार्यकारणी सदस्य राजे खंडेराव देशमुख, प्रकाश मामा कोंडलवार, सुभाष पाटील किनाळकर ,माजी जिल्हा परिषद सदस्य दिवाकर रेड्डी, भुजंगराव पाटील भोसले, गणपत पिटेवाड ,संतोष अण्णा मारकवार शिवसेनेचे अमोल पवार, चंद्रकांत नागमोड व्यंकट आसरवाड दिलीप जाधव कोंडदेव नगर विशाल माने श्रीकांत किनाळकर शेख जाफर इत्यादी उमेदवार व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी सर्व उपस्थितांचे आभार व मान्यवरांचे आभार किशोर पाटील लगळुदकर यांनी मांनले.

Google Ad