“मी गाडगेबाबा बोलतोय” शाहीर दिगू तूमवाड यांनी सादर केला एकपात्री प्रयोग

Adiwasi kranti Marathi news
भोकर (तालुका प्रतिनिधी) येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक समिती येथे ग्राम जयंती कार्यक्रमानिमित्त “मी गाडगेबाबा बोलतोय” हा एकपात्री प्रयोग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध शाहीर दिगु तूमवाड यांनी सादर करून गाडगे बाबांच्या वेशात जीवन चरित्र रेखाटले”
ग्रामस्वच्छतेचे पुजारी महान संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती ग्राम जयंती म्हणून साजरी केली जाते भोकर येथे 21 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारक समिती आश्रमात ग्राम जयंती साजरी करण्यात आली सामुदायिक प्रार्थना नंतर आयुक्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शाहीर दिगू तुम्हाला यांनी संत गाडगेबाबा यांच्या वेश्यामध्ये गाडगे बाबांचे जीवन चरित्र रेखाटले. गाडगे बाबांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झालेला त्यांचे वडील दारूच्या व्यसनाधीन झालेले त्यानंतर त्यांचा मृत्यू होतो, कुटुंबाची जबाबदारी डेबुजी कडे येते, गावातील सावकाराकडून करण्यात आलेली फसवणूक, शेती गहाण ठेवून व्याज वसूल करण्याची प्रथा, वाईट चालीरीती कोंबड्या बकऱ्याच्या बळी देणारी प्रथा, दारूचे व्यसन, अंधश्रद्धा, अशा सर्व बाबींवर प्रकाश टाकून गाडगे बाबांनी समाजासाठी केलेले महान कार्य स्वच्छतेचा संदेश, शिक्षण घेण्यासाठी उभारण्यात आलेल्या शाळा, गरिबांसाठी उघडण्यात आलेल्या धर्मशाळा, दवाखाने अशा अनेक विषयावर प्रकाश टाकून महान संत गाडगेबाबा यांचे विचार आज समाजाने घेतले पाहिजे त्यांच्या विचाराने गावाची स्वच्छता झाली पाहिजे असे विचार मांडून गीतामधूनही प्रबोधन केले यामध्ये संगीताची साथ शाहीर रमेश नारलेवाड, संभाजी आमेटवाड दिगंबर बिरदे, गंगाधर चुनकेवार यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. आर. पांचाळ यांनी केले उपस्थितांचे स्वागत बापूराव पाटील सोनारीकर यांनी केले

Google Ad