राजेश वेअर हाऊस मध्ये ठेवलेल्या हळदीचे शेतकऱ्यांचे 40 हजाराचे नुकसान

Adiwasi kranti Marathi news
नुकसान भरपाई देण्याची मागणी
**************************
भोकर (तालुका प्रतिनिधी) भोकर उमरी रोडवर जाकापूर शिवारात असलेल्या राजेश वेअर हाऊस मध्ये ठेवलेल्या 60 क्विंटल हळदीचे नुकसान होऊन प्रतवारी खराब झाल्याने 40 हजाराचे नुकसान झाल्याची तक्रार बेंबर येथील शेतकरी बाबुराव मानिक केंचे यांनी उपविभागीय अधिकारी भोकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मागील वर्षी मे महिन्यात माझ्या शेतातील हळद सर्व प्रक्रिया करून चांगल्या दर्जाचे असलेली राजेश वेअर हाऊस उमरी रोड भोकर येथे ठेवून पावती घेतली, चालू वर्षी सदर हळद विक्रीसाठी काढले असता हळदीला कीड लागलेला डंक लागलेला होता त्यामुळे हळदीची प्रतवारी खराब झाली, हळदीचे पीठ झालेले होते नांदेड येथील व्यापाऱ्याशी संपर्क करून हळद विक्रीसाठी नेली असता अत्यंत कमी भाव मिळाला प्रत्येक क्विंटल मागे 600 रुपयाचे नुकसान झाले 63 क्विंटल हळदीचे वजन असताना 1 क्विंटल 50 किलो हळद कमी झाली वेअर हाऊस मध्ये ठेवलेल्या हळदीची देखरेख करणे , कीड लागून देणे प्रतवारी खराब होऊ न देणे ही जबाबदारी राजेश वेअर हाऊस यांची होती मात्र त्यांनी योग्य काळजी घेतली नसल्यामुळे माझे 40 हजाराहून अधिक रुपयाचे नुकसान झाले आहे मला नुकसान भरपाई मिळवून द्यावी सदर वेअर हाऊसचा परवाना रद्द करावा, संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी भोकर सहायक निबंधक भोकर यांच्याकडे बेंबर येथील शेतकरी बाबुराव माणिक केनचे यांनी केली आहे

Google Ad