टिपू सुलतान यांच्या शहीद दिनानिमित्त शहीद टिपू सुलतान चौकत अभिवादन केले..

Adiwasi kranti Marathi news

भोकर (प्रतिनिधी) इंग्रजांनी व्यापाराच्या माध्यमातून भारतात आल्यानंतर भारतात आपले हात पाय पसरी सुरू केले होते त्यावेळेच्या राज्यकर्त्यांच्या सोबत युद्ध करून अनेक राज्य आपल्या ताब्यात घेतली होती व तसेच अनेक राज्यांच्या राजांना पत्रव्यवहार द्वारे आमच्यासह मिळून आमच्या छत्रछायेखाली तुमचे राज्य चालवावे असे आवाहन केले होते त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक राज्याच्या राजांनी त्यांच्यासोबत हात मिळवणी करून आपला राज्यकारभार इंग्रजांच्या छत्रछायेखाली चालविला इंग्रजा सोबत गेल्याने आपल्या संस्कृतीवर काय परिणाम होईल याचा विचार इंग्रजांसोबत जाणाऱ्या राजांनी केला नाही इंग्रजांनी नवीन नवीन कायदे आणून भारतीयांचा अतोनात छळ सुरू केला होता इंग्रजांच्या विस्ताराला प्रमुख  अडथळा हे मैसूरचे राजे टिपू सुलतान हे होते त्यांनी इंग्रजा सोबत मिळून राज्यकारभार न चालवता  त्यांनाच  भारतातून हाकलण्याचा निश्चय केला व्यापाराच्या माध्यमातून भारतात येऊन   आपणाला  गुलाम बणवून ठेवायचे इंग्रजांचे मनसुबे  होते   हे लक्षात आल्याने मैसूरचे राजे टिपु सुल्तान  यांनी इंग्रजांशी कोणतीही तडजोड न करता त्यांना आपल्या मातृभूमि तुन  हाकलायचे  निश्चय केले व शेवटच्या श्वासापर्यंत इंग्रजाशी   सोबत लढतांना शहीद झाले
दि ४मे  रोजी म्हेसूर चे राजे टिपू सुल्तान यांच्या शहिद दिना निमीत्त शहरातील शहीद टिपू सुल्तान चौक येथे अभीवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहीद टिपू सुलतान यांच्या कार्याचा उल्लेख करत आजच्या काळात भांडवलशाही विरोधात लढणाऱ्या युद्धाची गरज असल्याचे मत उपस्थित आणि व्यक्त केले यावेळी जमीयते उलैमा ए हिंद चे जिल्हाउपाध्यक्ष मौलाना मुबीनखाॅन इनामदार, भोकर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खाजू इनामदार, एम आय एम पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष शेख करीम करखेलीकर एम आय एम चे नेते बाबाखाॅन, एम आय एम चे भोकर तालूका अध्यक्ष सय्यद जुनेद पटेल, एम आय एम शहराध्यक्ष शेख निजाम युवक काँग्रेसचे फारूक करखेलीकर सामाजिक कार्यकर्ते रहीम दादा, सामाजिक कार्यकर्ते मन्सूर खान पठाण कोळगावकर ,बशीर भाई ,हाफेज कामरान,सय्यद जुनेद, आसीफ भाई, शाहरूख खाॅन, शेख समरान ,फैसल मिर्झा ,शेख माजीद लाला ,युनूस लाला,ईसाक पठान,नासेर शेख,शेख बाबा,मुन्ना कांबळे,सह आदि उपस्तिथ होते

Google Ad