भोकर मध्ये एस बी आय ने नेमलेले ग्राहक केंद्र फक्त नावा पुरतेच…

भोकर येथील एस. बी. आय. बँकेकडून ग्राहकांना बँकेत येण्यासाठी होणारी अडचण दूर व्हावी यासाठी ग्राहक सेवा केंद्र (सीएसपी) नेमण्यात आले

मात्र या केंद्रावर बँकेच्या खातेदारांना सुविधा मिळत
नाहीत, अनेक केंद्र बंद राहतात, काही केंद्र चालक
पैसे देखील घेत असल्याच्या तक्रारी आहेत..
भोकर येथील एसबीआय बँकेच्या कारभाराची
व्याप्ती पाहता मोठ्या प्रमाणावर खातेदारांची संख्या इथे
आहे. बँकेचा कारभार सुरळीत व्हावा म्हणून ग्राहक
सेवा केंद्र (सीएसपी) नेमण्यात आले मात्र सदर ग्राहक
केंद्र चालक हे आपले केंद्र बंदच ठेवत असतात. काही
ठिकाणचे पत्ते देखील बदलून आहेत. त्या ठिकाणी
सदर केंद्र चालू नाहीत, काही चालू असले तरी ते पैसे
काढण्यासाठी ग्राहकांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी
आहेत. ग्राहकांना सुविधा मिळत नाहीत, नेट चालू
नाही असे सांगितले जाते. फिनो, एचडीएफसी, असे
अनेक प्रकारचे ग्राहक सेवा केंद्र चालवून पैसे
काढण्यासाठी ग्राहकांकडून अधिक पैसे घेऊन लूट
करत असतात. ग्रामीण भागातील भोळ्या भाबड्या जनतेला काही समजत नसल्याने त्यांच्या
अशिक्षितपणाचा गैरफायदा देखील काही केंद्र चालक
घेत आहेत. काही गरीब अशिक्षित लोकांच्या
खात्यावरील पैसे गायब झाल्याच्या तक्रारी देखील
आहेत. या बेबंदशाही कारभारामुळे ग्रामीण जनतेची
लुबाडणूक केली जात आहे. या कारभाराबाबत वरिष्ठ
बँक अधिकाऱ्यांनी चौकशी करून सर्वसामान्य जनतेला
न्याय द्यावा अशी मागणी होत आहे. भोकर शहरामध्ये
एसबीआय बँकेचे अधिकृत ग्राहक सेवा केंद्र चालक
नेमण्यात आले आहेत. ९ ग्राहक सेवा केंद्र भोकर मध्ये
नोंदणीकृत आहेत. त्यापैकी २ ग्राहक सेवा केंद्र चालू
असलेले दिसतात इतर सेवा केंद्र मात्र बंद स्थितीत
असून अनेकांचे पत्ते बदललेले आहेत. त्या ठिकाणी
सदर केंद्र चालूच नाहीत. एसबीआय बँकेमध्ये कमी
रक्कम उचलण्यास देत नाहीत ग्राहक सेवा केंद्राकडे
जा असे म्हणतात मात्र ग्राहक सेवा केंद्र देखील योग्य
सेवा देत नसल्याने बँक खातेदारांची मोठी अडचण
निर्माण झाली आहे, अनेक ग्राहक सेवा केंद्रांनी मंजुरी
घेतलेली आहे मात्र ते बंद स्थितीमध्येच आहेत या सर्व
केंद्रांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी
मागणी होत आहे.

Google Ad