उमरी येथे आज बसवेश्वर जन्मोत्सवानमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन …
Adiwasi kranti Marathi news
उमरी ता प्रतिनिधी कैलास सोनकांबळे /अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने क्रांती सूर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 892 व्या जन्मोत्सवानिमित्त उमरी शहरात सोमवारी दिनांक 8 मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ. माधव विभुते गोरठेकर यांनी दिली आहे.
सोमवारी दिनांक 8 मे रोजी सकाळी नऊ वाजता महात्मा बसवेश्वर चौकात महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष मारोतराव पाटील आनेराये यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.
सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत शहराच्या मोंढा भागात भव्यरक्तदान शिबिर होणार आहे. सायंकाळी चार ते सहा क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर यांच्या तैलचित्राची शहराच्या मध्यवर्ती भागातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता मोंढा भागात गुरुपदेश व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास 108 डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, 108 डॉ.
सिद्धदयाल शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. श्री मनोहर धोंडे, कार्यक्रमाचे उद्घाटक शिरीष गोरठेकरसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते व महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.