गोल्डन ज्यूबली मित्र मंडळ सारडेचा 35 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

Adiwasi kranti Marathi news

उरण दि 13(विठ्ठल ममताबादे )गोर गरिबांचे प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपसण्याच्या अनुषंगाने सन 1989 साली स्थापन झालेल्या गोल्डन ज्यूबली मित्र मंडळ सारडे ही सामाजिक संघटनेने गुरवार दि 11/5/2023 रोजी 35 व्या वर्षात पदार्पण केला आहे. गोल्डन ज्युबली मित्र मंडळ सारडेचा 35 वा वर्धापन दिना निमित्त उरण तालुक्यातील सारडे येथे विविध उपक्रम राबवून वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरी केली गेली. दु. 2 ते 4 श्री सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी 4 ते 6 महाप्रसाद,रात्री 7 ते 8 प्रमुख पाहूण्यांचा सत्कार प्रदान सोहळा, नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार, रात्री 9 ते 11 स्टेप आर्ट डान्स अकॅडमी प्रस्तुत जल्लोश सुवर्णयुगाचा नृत्य आणी हास्याचा सुरेख नजराणा असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात उत्तम प्रतिसादासह संपन्न झाले.

श्री साई देवस्थान साईनगर वहाळचे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील, नरेंद्रशेठ मुंबईकर ( माजी सरपंच वेश्र्वी ),महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर,भारतदादा भोपी ( उपाध्यक्ष आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था )संगिता ताई ढेरे (रायगड भूषण ),रोहनदादा पाटील (कार्याध्यक्ष आगरी,कोळी कराडी संघर्ष संस्था ), सुदेश पाटील अध्यक्ष श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था,विठ्ठल ममताबादे कार्याध्यक्ष,रोशन पाटील (सरपंच ), चंद्रशेखर पाटील (माजी सरपंच ), महेश पाटील (ग्रा. पं. सदस्य ),प्रतिक्षा पाटील (सदस्या ),अमिता पाटील ( सदस्या),पप्पू सूर्यराव(प्रसिद्ध कलाकार )नितेश पंडित(प्रसिद्ध निवेदक )सुनिल वर्तक (प्रसिद्ध निवेदक ),हेमाली म्हात्रे,मोहन फुंडेकर, सुशांत पाटील,हिराचंद म्हात्रे (अध्यक्ष )जितेंद्र म्हात्रे,(उपाध्यक्ष ) देवीदास पाटील (कार्याध्यक्ष ) संजीव माळी (खजिनदार)आदी विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवर उपस्थित होते.या सर्वांनी गोल्डन ज्यूबली मित्र मंडळ सारडे या संघटनेच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोल्डन ज्यूबली मित्र मंडळ सारडेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली होती.

Google Ad