बाळकृष्ण पुंडलिक म्हात्रे यांचे दुख:द निधन
Adiwasi kranti Marathi news
उरण दि 23 ( विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील कोप्रोली गावातील सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण पुंडलिक म्हात्रे यांचे गुरुवार दि 18 मे 2023 रोजी अल्पशा आजाराने दुख:द निधन झाले.श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे राज्य सोशल मीडिया प्रमुख साहिल म्हात्रे यांचे ते वडिल होते.मृत्यूसमयी त्यांचे वय 54 होते. अतिशय प्रेमळ व नम्र असा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांना एक मूलगी व एक मुलगा असा त्यांचा कुंटूब परिवार आहे. बाळकृष्ण पुंडलिक म्हात्रे यांच्या निधनाने म्हात्रे कुटुंबीय व कोप्रोली ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. घरातील कर्ता करविता व्यक्तीचे निधन झाल्याने नागरिकांनी दुख: व्यक्त केले आहे.श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांनी या दुःखद प्रसंगी त्यांच्या घरी जाऊन म्हात्रे कुटुंबाचे सांत्वन केले व दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली.कै. बाळकृष्ण म्हात्रे यांचा दशक्रिया विधी शनिवार दि 27 मे 2023 रोजी श्री क्षेत्र माणकेश्वर (उरण ) येथे तर तेरावा विधी रविवार दि 28 मे 2023 रोजी त्यांच्या राहत्या घरी कोप्रोली येथे होणार आहे.