प्रति त्र्यंबकेश्वर – श्री क्षेत्र वल्डेश्वर देवस्थान ट्रस्ट बेलपाडा.

Adiwasi kranti Marathi news -portal

उरण तालुका व पनवेल तालुका यांच्या सीमेवर बेलपाडा हे गाव असून हे गाव पनवेल तालुक्यात असून जेएनपीटी परिसरातील खाडी किनारी हे वसलेले छोटेसे गाव आहे. हे गाव निसर्गाने समृद्ध असून या गावातील श्री क्षेत्र वल्डेश्वर मंदिर हे भगवान शिव शंकराचे अतिशय सुंदर व मनमोहक असे मंदिर आहे. भाविक भक्तांच्या नवसाला पावणारा भाविक भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा म्हणून या देवतेची ख्याती आहे. सदर या देवतेचे महत्त्व, नागरिकांचे भावना लक्षात येऊन बेलपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर सुदाम कडू यांनी 2021 साली येथे मंदिर बांधले श्री क्षेत्र वल्डेश्वर देवस्थान ट्रस्ट बेलपाडा या नावाने ट्रस्ट स्थापन करून मंदिराचा व मंदिराच्या आजूबाजूच्या परिसराचा कायापालट केला.या ट्रस्टच्या मंदिराच्या परिसरात वेगवेगळ्या फळा झांडाची लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला आहे. गावातील मृत्यू झालेल्या नागरिकांसाठी येथे अंत्यविधी सुद्धा उत्तम सोय आहे.लग्नाच्या कार्यक्रमासाठी नागरिकांसाठी येथे मंगल कार्यालय सुद्धा आहे. कोणतेही लग्न कार्य, धार्मिक विधीसाठी प्रशस्त असे सभागृह आहे.बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी स्त्रियांसाठी वेगळी रूम,पुरुषांसाठी वेगळी रूम , ब्राह्मणासाठी वेगळी रूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मंदिरात व आजूबाजूच्या परिसात 24 तास वीजेची व पाण्याची उत्तम सोय आहे. राहण्याचीही उत्तम सोय आहे.भाविक भक्तांना कोणतेही अडचण येणार नाही कींवा त्रास होणार नाही असे उत्तम व्यवस्थापन असल्याने दर सोमवारी तसेच श्रावण महिन्यात व विविध सणांच्या दिवशी येथे भाविक भक्तांची खूप मोठी गर्दी असते.ट्रस्ट द्वारे विधवा महिलांना मंदिरालगत असलेले दुकानाचे गाळे मोफत चालविण्यास देण्यात आलेले आहे. अनेक भाविक भक्त विविध धार्मिक विधीसाठी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथ जातात. तिथे विविध धार्मिक विधी करतात.उरण पनवेल परिसरातील, रायगड जिल्ह्यातील अनेक भाविक भक्त त्र्यंबकेश्वर येथे जातात. त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी व तेथून परत घरी परतण्यासाठी भरपूर वेळ लागतो शिवाय तेवढेच वेळ, पैसा श्रम जास्त जातो त्यामूळे हा श्रम वेळ पैसा वाचवून प्रति त्रंबकेश्वर असलेले श्री क्षेत्र वल्डेश्वर, बेलपाडा, ता. पनवेल येथ येऊन सर्व धार्मिक विधी करावे, विधी साठी सर्व अत्यावश्यक सुविधा उपलब्ध आहेत.त्यामुळे नागरिकांनी श्री शंकर देवतेचे दर्शन घेऊन या प्रति त्र्यंबकेश्वर असलेल्या श्री क्षेत्र वल्डेश्वर तीर्थक्षेत्राला एकदा तरी आवर्जून भेट दयावे असे आवाहन श्री क्षेत्र वल्डेश्वर देवस्थान ट्रस्ट बेलपाडाचे मालक मधुकर सुदाम कडू यांनी केले आहे.

शब्दांकन -लेखक विठ्ठल ममताबादे, उरण

Google Ad