आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस भोकर ग्रामीण रुग्णालयात साजरा..

Adiwasi kranti Marathi news portal
भोकर- तालुका विधी सेवा समिती भोकर व ग्रामीण रुग्णालय भोकर यांच्या सयुंक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबीर अंतर्गत ” आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस ” आज दिनांक 23 मे 2023 रोजी ग्रामीण रुग्णालय भोकर येथे डॉ अनंत चव्हाण वैद्यकीय अधिक्षक भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डी.डी. माने सह दिवाणी न्यायाधीश क स्तर भोकर, प्रमुख पाहुणे विधिज्ञ श्री एम.पी.पेदे जिल्हा न्यायालय भोकर, रजाक सेठ रुग्ण कल्याण समिती सदस्य भोकर, डॉ सागर रेड्डी वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय भोकर.

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिना कायदेविषयक माहिती व संरक्षण याची माहिती विधिज्ञ श्री एम.पी.पेदे जिल्हा न्यायालय भोकर यांनी दिली.
कायदेविषयक बाबीची सविस्तर माहिती श्री.डी.डी. माने सह दिवाणी न्यायाधीश क स्तर भोकर यांनी दिली.
सूत्रसंचलन सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य सहाय्यक यांनी केले.यावेळी सुदेश घोलप ग्रामीण रुग्णालय भोकर येथील डॉ विजया किनिकर, संजय देशमुख सहायक अधीक्षक, मनोज पांचाळ, बालाजी चांडोलकर, अत्रिनंदन पांचाळ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, संदीप ठाकूर औषध निर्माण अधिकारी, श्रीमती सुचिता नवघडे परिसेविका, राजश्री ब्राम्हणे, संगीता महादळे, धूरपता भालेराव अधिपरिचारिका, मुक्ता गुट्टे, संगीता पंदिलवाड आरोग्य सेविका, पांडुरंग तम्मलवाड, नामदेव कंधारे आरोग्य कर्मचारी, सुरेश डुमलवाड, जाहेद अली, शिंदे मामा, सेवक व नागरिक उपस्थित होते.
आभार प्रदर्शन डॉ सागर रेड्डी यांनी केले.

Google Ad