महाराष्ट्र स्टेट लेव्हल सीनियर आणि मास्टर किकबॉक्सिंग स्पर्धेत रायगडने मारली बाजी.
उरण दि ७(विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र स्टेट लेव्हल सीनियर आणि मास्टर किकबॉक्सिंग स्पर्धा दिनांक ४/६/२०२३ रोजी बालेवाडी ,पुणे येथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये रायगड किक बॉक्सिंग टीमने घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत
१) आदित्य ठाकूर – दोन गोल्ड मेडल
२) शुभम म्हात्रे – दोन गोल्ड मेडल
३) प्रीतम मोकल – एक गोल्ड मेडल
४) जिग्नेश म्हात्रे – एक गोल्ड मेडल
५) आकाश भिडे – एक गोड मेडल
६) मोनिका मोर्या – एक गोल्ड मेडल
७) रिताशा सुर्वे – एक गोल्ड मेडल
८) भावना मलानी – एक गोल्ड मेडल
९) स्नेहा ठाकूर – दोन सिल्वर मेडल
१०) कमलाकर म्हात्रे – एक सिल्वर मेडल
११) सिद्धेश पाटील – एक सिल्वर मेडल
१२) सुमित ठाकूर – एक सिल्वर मेडल
१३) केवल मोकल – एक सिल्वर मेडल
१४) सम्यक गायकवाड – एक सिल्वर मेडल
१५) यश जोशी – एक ब्रांन्झ मेडल
१६) आर्यन पाटील – एक ब्रांन्झ मेडल
१७) नम्रता ठाकूर – दोन ब्रांन्झ मेडल पटकाविले.
या खेळाडूंनी अतिशय कौस्तुकास्पद कामगिरी केली आहे. या स्पर्धेमध्ये २७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .राज्यस्तरीय स्पर्धेत २७ जिल्ह्यांनी महानगरपालिकांच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत रायगड टीमने महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे रनर ट्रॉफी पटकावून रायगड जिल्ह्याचा तसेच कर्जत ,पनवेल, पेण,रोहा,उरण तालुक्याचा ठसा उमटवला आहे.या स्पर्धेसाठी कोच म्हणून जीवन ढाकवाल (कर्जत), दीपक घरत आणि विशाल सर ( उरण), मुकेश सिन्हा ( रोहा),हेड कोच संतोष मोकल (पेण),टीम मॅनेजर दीपेश सोलंकी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.तसेच सुधाकर घारे रायगड किकबॉक्सिंग अध्यक्ष,मधुकर घारे- रायगड किकबॉक्सिंग कार्याध्यक्ष,विजय भोईर (उरण)- रा.जि. प.सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने चांगली कामगिरी केली आहे.या स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या सर्व खेळाडूंचे ,कोचेस यांचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत असून त्यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.