शेतकरी सन्मान योजने अंतर्गत मोफत खत वाटप
उरण दि 12(विठ्ठल ममताबादे ) जनसेवेतून आनंद देणा-या वशेणी इतिहास संपादकीय मंडळाने शेतकरी सन्मान योजना सुरू केली असून पहिल्या टप्प्यात उरण तालुक्यातील वशेणी आणि पुनाडे गावातील 200 शेतकरी बंधू भगिनिंना मोफत खत वाटप करण्यात आले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून वशेणी गावच्या सरपंच अनामिका म्हात्रे, इंडिया झिंदाबाद फ्रेण्डस गृप रायगड चे अध्यक्ष रमेश थवई, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उरणचे अध्यक्ष महेंद्र गावंड, ग्रामपंचायत सदस्या प्रिती पाटील,माजी पंचायत समिती सदस्य लवेश म्हात्रे,रमण पंडीत सर, बी.जे.म्हात्रे,गणेश खोत,
डाॅक्टर रविंद्र गावंड,मनोज गावंड ,पुरूषोत्तम आदी मान्यवर उपस्थित होते.
तर सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संदेश गावंड,अनंत तांडेल, गणपत ठाकूर, हरेश्वर पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.
यंदाचे वर्ष हे वशेणी इतिहास संपादकीय मंडळाने शेतकरी सन्मान वर्ष म्हणून जाहीर केले असून शेतक-याच्या हितासाठी विविध उपक्रम राबवण्या साठी मंडळ प्रयत्न करेल असा विश्वास कार्यवाहक मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केला.