वशेणी येथे मोफत वह्या वाटप कार्यक्रम संपन्न.

Adiwasi kranti Marathi news portal

उरण दि 17(विठ्ठल ममताबादे )वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे सदस्य तथा वशेणी गावाची डाॅक्टरी सेवा करणारे स्वर्गीय डाॅक्टर शरद गणपत पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथी दिना निमित्त डाॅक्टर शरद पाटील परीवार यांच्या सौजन्याने इयत्ता दहावीच्या मुलांना मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन वशेणी इतिहास संपादकीय मंडळाकडून करण्यात आले होते.या वेळी डाॅक्टर शरद पाटील यांच्या डाॅक्टरी जनसेवाचा प्रकाश समाजात दरवळत राहण्यासाठी श्रध्दांजली म्हणून प्रकाशाची एक पणती डाॅक्टर सिध्दराम अरवत्ती पाटील यांच्या शुभहस्ते प्रज्वलित करण्यात आली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शालेय विद्यार्थांना डाॅक्टर शरद पाटील यांच्या जनसेवेचा, स्वभाव वैशिष्ट्यांचा परिचय मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी करून दिला.छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय वशेणी, रायगड एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मेडियम वशेणी,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन, तु.ह.वाजेकर विद्यालय फुंडे,रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे,
पी.आर .पी.विद्यालय पाणदिवे
या विद्यालयात वशेणी गावातील इयत्ता दहावीत शिकणा-या
51 मुलांना डाॅक्टर सिध्दराम पाटील यांच्या शुभहस्ते लाॅगबुक 142 पानी वह्यांचे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमास डाॅक्टर रविंद्र गावंड, गणेश मूर्तीकार जगन्नाथ म्हात्रे, पागोटे शाळेचे मुख्याध्यापक अनंत पाटील,माजी सरपंच संदेश गावंड, सारडे गावचे सामाजिक कार्यकर्ते समीर पाटील, विश्वास पाटील,लता ठाकूर,नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुरूषोत्तम पाटील, हरेश्वर पाटील, गणेश पाटील आदींनी मेहनत घेतली.

Google Ad