दिवंगत लोकनेते दि.बा.पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त उरणमध्ये वक्तृत्व स्पर्धा रांगोळी स्पर्धा व स्मृतीदिन मेळाव्याचे आयोजन.

Adiwasi kranti Marathi news portal

उरण दि 17 (विठ्ठल ममताबादे ) दिवंगत लोकनेते,प्रकल्पग्रस्तांचे कैवारी, साडेबारा टक्केचे जनक, माजी खासदार दि.बा.पाटील यांचा 24 जून 2023 रोजी 10 वा स्मृतिदिन आहे. रायगड जिल्हा,नवी मुबई, ठाणे जिल्ह्यामध्ये हा स्मृतिदिन विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था, संघटना तर्फे विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांनी साजरी होणार आहे. उरण तालुक्यात जेएनपीटीचे माजी विश्वस्त कॉम्रेड भूषण पाटील व दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई सर्व पक्षीय कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 24 जून 2023 रोजी मल्टीपर्पज हॉल, जेएनपीटी टावूनशिप, उरण येथे सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच लोकनेते दि बा पाटील यांच्या विचार व कार्य यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी स्मृतीदीन मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे.स्मृतीदिन मेळावा हा सायंकाळी 4:30 वाजता मल्टीपर्पज हॉल, जेएनपीटी टावूनशिप उरण येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी दि.बा.पाटील प्रेमींनी , समर्थकांनी,शेतकरी, प्रकल्पग्रस्तांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जेएनपीटीचे माजी विश्वस्त कॉग्रेड भूषण पाटील व दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई सर्व पक्षीय कृती समिती तर्फे करण्यात आले आहे.स्पर्धेत भाग घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी रमाकांत गावंड फोन नंबर -9022713035, गिरीश पाटील – 9870 429677 यांच्याशी संपर्क साधावे.

Google Ad