भोकर तालुक्यात खाजगी शिक्षण संस्थांकडून लाखो रुपयांचीफी वसुली:संस्था बनणल्या व्यवसायाचे साधण..

संस्था चालकांनी मांडला शिक्षणाचा बाजार 
पालकांची केली जाते आर्थिक लूट
********************************************
भोकर( तालुका प्रतिनिधी)शासनाने गरिबांना मोफत शिक्षण मिळेल,सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय करण्यात आलेली आहे, शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये,शिक्षणाचा हक्क हा कायदा देखील केलेला असला तरी आठवी नंतर प्रवेश घेण्यासाठी,दहावीनंतर प्रवेश घेण्यासाठी,बारावी नंतरच्या प्रवेशासाठी मोठी फीस खाजगी शिक्षण संस्था कडून वसुली करण्यात येत असल्यामुळे गरीब मुलांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे,भोकर तालुक्यात शिक्षण संस्थांनी शिक्षणाच्या फी वसुलीचा बाजार मांडला असून गोरगरीब सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड झाले आहे.
भोकर तालुका तसा सर्वच बाबींनी विकासामध्ये मागे आहे, तालुक्यात उद्योग धंद्याची मोठी कमतरता आहे,सिंचनाची व्यवस्था तालुक्यात नाही,कारखाने सुद्धा या भागात नसल्याने सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, मोठे उद्योग सुद्धा या भागात आतापर्यंत आले नाहीत शिक्षणाची सुद्धा या ठिकाणी म्हणावी तशी व्यवस्था झाली नसून काही प्रमाणात मागील दहा वर्षांमध्ये शिक्षणाची साधारणता व्यवस्था झाली आहे, ग्रामीण भागात अजूनही म्हणावी तशी सर्वसामान्य पर्यंत शिक्षण व्यवस्था पोहोचली नाही जिल्हा परिषदेच्या शाळांमधून म्हणावी तशी दर्जेदार शिक्षण व्यवस्था होत नाही काही पालकांमध्ये सद्यस्थितीत शिक्षणाविषयी जनजागृती झाली असून इंग्रजी शाळांमध्ये आपल्या पाल्यांना टाकण्यासाठी त्यांचे प्रयत्न होताना दिसून आहेत मात्र इंग्रजी शाळांच्या मोठ्या फी वसुलीमुळे आपल्या पालकांना शिक्षण देणे सुद्धा अवघड झाले आहे पहिल्या वर्गापासून फिश शाळांना लागते आठ दहा हजार ते 25 हजारापर्यंत शिक्षणासाठी फीस विद्यार्थ्यांना द्यावी लागते खाजगी शिक्षण संस्थांच्या बाजारामुळे गरिबांना शिक्षण महागडे झाले आहे शिक्षणाचे ओझे गरीब पालकांना सोसवत नाही.
* खाजगी शाळांच्या फी वसुलीने पालक झाले त्रस्त
******************************************†***
जिल्हा परिषद शाळांमध्ये आपल्या मुलांना पाठवण्या साठी पालक धजत नाहीत जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षणाचा दर्जा खालावत चालला असल्याचे सर्वसामान्य पालकांचे मत आहे इंग्रजी शाळेला पहिल्या वर्गापासूनच दरवर्षी दहा ते बारा हजार रुपये फीस भरावी लागते त्यानंतर प्रत्येक वर्गानुसार दरवर्षी२५ हजार रुपये पर्यंत फीस वाढत जाते दहाव्या वर्गाला तर २ लाख खर्च सोसावा लागतो अकरावीनंतर बारावी साठी तर फीस भरणे म्हणजे पालकांना कर्ज काढावे लागते बारावी नंतरचे शिक्षण घेणे ग्रामीण भागातील सर्वसामान्य बालकांना परवडणारे नसून खाजगी ट्युशन व इतर संस्थांची फीस यामुळे पालकांना मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे परिणामी कर्जबाजारी सुद्धा व्हावे लागत आहे एवढा खर्च करून सुद्धा नोकरी लागेल याची आम्ही नाही अनेक विद्यार्थी आज सुशिक्षित बेरोजगार आहेत.
* भोकर मध्ये खाजगी शिक्षण संस्था कडून भरमसाठ फी वसुली
**********************************************
भोकर मध्ये काही गाजलेल्या शिक्षण संस्था नामांकित असून तिथे प्रवेश घेण्यासाठी काहीच न बोलता फीस द्यावी लागते पहिल्या वर्गापासून फीस चा बाजार सुरू होतो आठव्या वर्गाला मोठ्या प्रमाणावर फीस,दहाव्या वर्गासाठी मोठ्या प्रमाणावर फीस बाराव्या वर्गासाठी मोठ्या प्रमाणावर फी ही गुप्तरित्या द्यावी लागते तरच शाळेमध्ये प्रवेश दिल्या जातो अन्यथा शाळेत प्रवेश दिला जात नाही, भोकर मध्ये दहा वर्षापूर्वी एका राजकीय नेत्याच्या शिक्षणसंस्थेमध्ये मुख्याध्यापकांनीच मोठ्या प्रमाणावर फीस वसुली करून लाखो रुपये जमा केले होते, ही बाब सदर संस्था चालकांच्या निदर्शनास आल्याने मुख्याध्यापकास त्यांनी घरी बसविले मात्र सदर मुख्याध्यापक घरीच बसून पगार मात्र उचलत असल्या ची जोरदार चर्चा आहे शिक्षण विभागाने ह्या गंभीर प्रकाराची दखल घेणे गरजेचे आहे
* गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे झाले महाग
**********************************************
भोकर तालुक्यात काही नामांकित संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी दहावीनंतर व बारावीनंतर मोठ्या प्रमाणावर फीस मोजावी लागत आहे ,दहा ते बारा हजार रुपये अकरावी प्रवेशासाठी फीस भरावी लागत खाजगी संस्थांमध्ये त्याशिवाय प्रवेश दिल्या जात नाही काही राखीव जागा आहेत असे सांगून विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्या जातो फीस भरल्याशिवाय विद्यार्थ्यांचा प्रवेश होत नाही त्यामुळे ग्रामीण भागातील पालक त्रस्त झाले आहेत खाजगी शिक्षण संस्थाचालकाकडून होणारी पालकांची लूट थांबवणे गरजेचे आहे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अवघड झाले असून शासनाने ह्या गंभीर फी वसुलीच्या प्रकरणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे विद्यार्थ्याकडून फीस वसूल केलेली पावती दिली जात नाही गुप्तरीत्या फीस घेतली जाते कोणाला किती फीस घ्यायची ही संस्थेच्या मनावर आहे भोकर मध्ये नियमबाह्य अनधिकृतरित्या फीस वसुली करणाऱ्या संस्थांची चौकशी शिक्षण विभागाने करावी अशी मागणी होत आहे

Google Ad