मे. पर्ल फ्रेट सर्विसेस प्रा लि. लोकल लेबर कामगारांचा वेतनवाढीचा करार संपन्न.

Adiwasi kranti Marathi news portal

उरण दि 24(विठ्ठल ममताबादे )राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघच्या वतीने मे. डिपी वर्ल्ड मल्टीमॅाडेल लॅाजिस्टीक प्रा. लि. (कॅान्टीनेंटल) खोपटे, उरण या कंपनी अंतर्गत मे. पर्ल फ्रेट सर्विसेस प्रा लि. लोकल लेबर कामगारांचा रू 7000/- वेतनवाढीचा करार संपन्न झाला.ग्रॅास पगार रू 32,900/- झाला आहे. त्यामुळे कामगारांनी आनंद व्यक्त केला आहे.

राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (आरएमबीकेएस ) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष कामगार नेते संतोषभाई घरत व रायगड जिल्हा अध्यक्ष गणेश यशवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि कामगार संघटनेचे राष्ट्रीय महासचिव एन. बी. कुरणे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 22/06/2023 रोजी कामगार उप आयुक्त कार्यालय पनवेल येथे सहाय्यक कामगार आयुक्त शितल कुलकर्णी मॅडम यांच्या मध्यस्ती अंती समक्ष वेतन वाढ करार संपन्न झाला.

सदर करार करण्याकरीता (कॅान्टीनेंटल) युनिट अध्यक्ष सुधिर ठाकूर आणि सह पदाधिकारी अच्युत ठाकूर,संदिप ठाकूर, परेश ठाकूर, किशोर ठाकूर, सुधाकर ठाकूर, विश्वास ठाकूर,मंगेश डाकी व इतर सर्व कामगारांची एकजूट लाभली. त्याचप्रमाणे बहुजन मुक्ती पार्टी चे रायगड जिल्हा अध्यक्ष करण (धोनी) भोईर यांचे सहकार्य लाभले. व्यवस्थापन मे. पर्ल फ्रेट सर्विसेस प्रा लि. चे डायरेक्टर जमशेद अश्रफ, मॅनेजर शरद पाटील, विशाल पाटील, मे. डिपी वर्ल्ड मल्टीमॅाडेल लॅाजिस्टीक प्रा. लि. (कॅान्टीनेंटल) कंपनीच्या (एच.आर) शिवांगीनी सिंग व अविनाश लोंढे यांचेही महत्वाचे सहकार्य लाभल्याने कामगारांनी या सर्वांचे आभार मानले.

सदर करारामध्ये रू. 7000/- ची भरघोस वाढ, पहिल्या वर्षि 6000/- व दुसऱ्या 500/-, तिसऱ्या वर्षि 500/- अशी वाढ. बेसीकमध्ये 50% रक्कम व इतर भत्त्यांमध्ये 50% आणि काळावधी 3 वर्षाकरीता करण्यात आला. विशेष म्हणणे कामगार बदली भरती सुविधा कायम ठेवण्यात आली तथा कामगार बदली भरती संदर्भात नविन कामगाराला जुन्या कामगारांइतके वेतन देण्यात येईल. आगाऊ कर्ज, ट्युज कोटा पुर्ण झाल्यावर एक्ट्रा ट्युज वर ओटी, लिव्ह इनकॅशमेंट तसेच सरकारी नियमा नुसार सर्व फायदे व ईतर सुविधा कामगारांना मिळणार आहे.

राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ (आरएमबीकेएस ) ने घेतलेल्या भुमिका व त्यांच्या नेतृत्वामुळे कामगार वर्ग आनंद साजरा करीत आहे. आणि संघनेच्या पदाधिकाऱ्यांवर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Google Ad