/भोकर प्रतिनिधी मानवास दीर्घायु व्हायचे असेल तर शेतात काम करणे गरजेचे आहे असे विचार महाराष्ट्रातील प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डक यांनी भोकर येथे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ भोकर व संदीप पाटील गोड मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या शेतकरी मार्गदर्शन व सन्मान डोळ्यात मार्गदर्शन करताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते श्री शिवाजी पाटील किन्हाळकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती भोकरचे सभापती जगदीश पाटील भोसीकर, जि. प. सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, माजी सभापती गोविंद बाबा गौड, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव तथा संपादक उत्तमरावजी बाबळे, ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड, सरपंच संघटना तालुका अध्यक्ष माधवराव अमृतवाड, आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेती औजारांचे पूजन करून व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पुढे बोलताना त्यांनी सांगितले की यावर्षी नांदेड जिल्ह्यात भरपूर पाऊस होईल तेव्हा शेतकऱ्यांनी न डगमगता जमिनीची ओली नऊ इंच भिजल्यानंतर पेरणी ला सुरुवात करावी. कापसाची लागण करताना शेतकऱ्यांनी लागवडीचे अंतर कमी करून बियाण्यांची संख्या वाढवावी तसेच शेतात उताराच्या बाजूने चर काढावे जेणे करून जास्तीचा झालेला पाऊसनिचरा होऊन उत्पन्न चांगले होईल निसर्गाच्या बदलाप्रमाणे शेतकरी ही बदलला पाहिजे तरच तो टिकाव धरणार आहे. प्रचंड झाडांच्या कतली झाल्यामुळे माळरान ओसाड झाला आहे त्यामुळे हवेतील तापमान प्रचंड वाढले असून यामुळे आपला हक्काचा पाऊस इतरत्र जात आहे म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर व मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांची जोपासना करा यासह आदी महत्त्वाच्या बाबी त्यांनी शेतकऱ्यांना सांगून शेतकऱ्यांनी निसर्गाकडे अत्यंत बारकाईने निरीक्षण करावे जेणेकरून निसर्गाचे संकेत आपल्याला ओळखता येतील असा मौल्यवान संदेश त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना दिला या कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर माजी जि. प. सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, माजी सभापती गोविंद बाबा गोड, शेतकरी नेते शिवाजी पाटील किनाळकर, आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमात तालुक्यातील शेतीनिष्ठआनंदराव रामजी रूमनवाड,

भुमाजी संभाजी टाकळे,
संजय नामदेव आरलवाड,
प्रकाश किशनराव देशमुख,
नंदकिशोर दिगंबर गायकवाड,
प्रतापराव जगदेराव कल्याणकर,
वरील सर्व शेतकऱ्यांचा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ भोकर व संदीप पाटील गौड मित्र मंडळाच्या वतीने सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला याकर्माचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी नार्लेवाड यांनी केले तर पत्रकार संघाचे सचिव आर. के. कदम यांनी प्रमुख मार्गदर्शक पंजाबराव डक यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचलन श्रीकांत मुक्कानवार व विपीन पवनकर सर यांनी केले तर आभार संदीप पाटील गौड यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष गंगाधर पडवळे उपाध्यक्ष विजयकुमार चिंतावार, कमलाकर बरकमकर कोषाध्यक्ष बालाजी कदम, विठ्ठल सुरलेकर, गजानन गाडेकर, शुभम नर्तावार, सुधांशू कांबळे, संदेश कांबळे, संभाजी कदम, विशाल जाधव, अंबादास बोयावार, निळकंठ पडवळे, श्रीकांत बाबळे व संदीप पाटील गोड मित्र मंडळाने मौलाचे योगदान दिले तर या कार्यक्रमास तालुक्याभरातून असंख्य शेतकऱ्यांनी उपस्थिती लावली होती.

Google Ad