Adiwasi kranti Marathi news
भोकर (तालुका प्रतिनधी)भोकर शहरासह तालुक्यात व्रक्षा रोपन करून त्याची जोपासना करण्याचे महत्वपूर्ण काम करून सामाजीक चळवळीत अग्रेसर राहणार्या सावली प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बी.आर. पांचाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
युद्ध का योगा सेंटर येथे सावलीचे ज्येष्ठ मार्गदर्शक पत्रकार बाबुराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन सावलीचे कार्य पुन्हा जोमाने सुरू करण्यात यावे असा ठराव उपस्थित्यांनी मांडला त्या दया गुंडेराव ठरावास अनुमोदन देऊन प्रशांत पो पोपसेटवार यानी नवीन अध्यक्षपदाच्या नावाची घोषणा केली त्यास उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून अनुमोदन दिले बी.आर.पांचाळ यांची नवीन अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली त्यांचे शाल पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले या बैठकीस माजी अध्यक्ष डॉ.विजयकुमार दंडे,महेश नारलावार,दया गुंडेराव,केतन पोलशेटवार, सचिन कमटलवार, चेतन कोटूरवार आदींची उपस्थिती होती.
सर्वांच्या सहकार्याने सामाजिक कार्य जोमाने करू
नव्या जोमाने सामाजिक कार्य करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे ज्या कोण्या सामाजिक कार्यकर्त्याला सावली प्रतिष्ठानच्या कामांमध्ये रस आहे त्यांनी आमच्या सोबत कामासाठी यावे येथे कोणताही पक्ष जात धर्म असा भेद नाही केवळ सामाजिक हेतू म्हणून आपण सर्वांनी मिळून शहरांमध्ये चांगले काम करूया वृक्षारोपण हा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे ते काम करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया असे मत नवनिर्वाचित अध्यक्ष बी.आर.पांचाळ यांनी बोलताना व्यक्त केले या नीवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Google Ad